In Jamkhed MLA Rohit Pawar has started a 600-bed jumbo hospital.jpg
In Jamkhed MLA Rohit Pawar has started a 600-bed jumbo hospital.jpg 
अहमदनगर

रोहित पवारांची पॉवरफुल कामगिरी; उभारले 600 बेडचे जम्बो हॉस्पिटल

वसंत सानप

जामखेड (अहमदनगर) : माणुसकीचा 'अध्यादेश' अंगीकारून रुग्णसेवेचे व्रत 'पालकत्वाच्या' भूमिकेतून आमदार रोहित पवारांनी जपले आणि कर्जत-जामखेड मध्ये नव्याने सहाशे बेडचे 'जंम्बो' हॉस्पिटल उभे करण्याचे काम हाती घेतले. या दिव्य कामाची  सुरूवात झाल्याने सहाशे रुग्णांसाठी उपयोगी ठरेल ऐवढे मोठे 'जम्बो 'कोवीड सेंटर उभारणारे जिल्ह्यातीलच नव्हे तर राज्यातील पहिले 'आमदार' रोहित पवार ठरले आहेत. ही कर्जत-जामखेडच्या नागरिकांसाठी अभिमानाची आणि दिलासा देणारी हृदय स्पर्शी ठरणारी घटना ठरली आहे.

जामखेडकरांना वरदान ठरलेल्या रँमन मँगसेस पुरस्कार विजेत्या स्वर्गीय डॉ. रजनीकांत आरोळे आणि मेबल आरोळे या दामपत्यांनी उभारलेल्या ग्रामीण आरोग्य प्रकल्पाअंतर्गत डॉ. शोभा आरोळे आणि रवी आरोळे यांच्या माध्यमातून कोवीड सेंटर गेली वर्षभरापासून सुरू आहे. या ठिकाणी पूर्वी दीडशे बेडची व्यवस्था होती. ती आता तीनशे बेडवर पोहचली आहे. नव्याने लोकहसभागातून मिळालेल्या मदतीच्या आधारे व्यवस्थेत आणखी दोनशे बेडची वाढ होत आहे. येथील मेबल आरोळे सभागृह आणि त्या शेजारी असलेल्या खानपानासाठी उभारलेल्या दालनात मिळून दोनशे बेड उभारणीचे काम अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे येथे तब्बल पाचशे बेड होतील. 

कोरोनाचा फैलाव लक्षात घेऊन आमदार रोहित पवारांनी पुढचे पाऊल उचलून ग्रामीण आरोग्य प्रकल्प याठिकाणीच नव्याने दोनशे बेडचे 'जम्बो' हॉस्पिटल उभारणीचे काम हाती घेतले आहे. त्यामुळे येथील कोवीड सेंटरमध्ये आता सातशे बेडची तर खाजगी रुग्णालयात असलेले एकशे वीस 'बेड' मिळून आठशे वीस बेड जामखेडकरांसाठी उपलब्ध असणार आहेत. यापैकी तीनशे वीस ऑक्सिजन बेड असतील तर बावीस व्हेंटिलेटर उपलब्ध राहतील. तर कर्जतला गायकरवाडी येथे जम्बों हॉस्पिटलचे काम प्रगतीपथावर असून चारशे बेडचे हॉस्पिटल उभे राहणार आहे. येथील उपजिल्हा रुग्णालयात 50 बेड उपलब्ध आहेत. खाजगी रुग्णालयातील 24 बेड असे मिळून 74 बेड कर्जतकरांसाठी उपलब्ध आहेत. नव्याने जंम्बो बेडच्या माध्यमातून आणखी काही ऑक्सिजन बेडची उपलब्धी होईल.

आमदार रोहित पवार हे या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर अतिशय संवेदशील असून कोरोनाच्या मुक्तीसाठी सुविधांचा उपलब्धीत कमी पडू नाही, याकरिता त्यांचा प्रयत्न आहे. यापूर्वी गेली वर्षभरापासून त्यांनी ग्रामीण आरोग्य प्रकल्पाला भरीव मदत दिली, त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद मिळाला आणि समाजातील दातृत्व संपन्न व्यक्तींची ही मदत मिळाली. कोरोनाच्या याकाळात आमदार रोहित पवारांनी केलेले काम समाजमनावर निश्चित पणे कोरले जाईल. जीवन मरणाच्या दारात मिळणारी ही मदत नागरिकांच्या कायम स्मरणात राहील हे मात्र निश्चित !

जामखेड येथील जम्बो कोवीड सेंटरच्या कामाचा शुभारंभ तहसीलदार विशाल नाईकवाडे, नायबतहसीलदार नवनाथ लांडगे, सुर्यकांत मोरे, रमेश आजबे, इस्माईल सय्यद, उमर कुरेशी, प्रकाश काळे, दादा काळदाते, अमोल गिरमे या तालुक्यातील तरुण कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत झाला. 

'जम्बो कोविड सेंटरची खूप मदत होईल. आमदार रोहित पवारांचा माध्यमातून हे चांगले काम उभे राहत आहे. तालुक्यात कोरोनाचा फैलाव वाढतो आहे. तो  रोखण्यासाठी नागरिकांनी विनामास्क फिरु नाही. सोशल डिस्टींगशन बरोबरच सँनिटायझरचा नियमित वापर करावा, शासनाने ठरवून दिलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे. 
 - विशाल नाईकवाडे, तहसीलदार, जामखेड.


 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rohit Pawar: रोहित पवारांनी शेअर केलेल्या 'त्या' व्हिडिओनंतर PDCC बँकेच्या मॅनेजरसह बँकेवर गुन्हा दाखल

Bidkin Crime News : धक्कादायक! भीशीचे व व्याजाचे पैसे न दिल्याने महिलेसह पाच मुलांचे अपहरण

Yuzvendra Chahal: ऋषभ पंतची विकेट चहलसाठी ठरली ऐतिहासिक! T20 मध्ये कोणत्याच भारतीयाला न जमलेला केला पराक्रम

Lok Sabha Election 2024: देशभरात तिसऱ्या टप्प्यात 61 टक्के, महाराष्ट्रात 54.09 टक्के मतदान

IPL 2024 DC vs RR Live Score: दिल्लीचे राजस्थानसमोर 222 धावांचे लक्ष्य! फ्रेझर-मॅकगर्क, पोरेलचे अर्धशतक, तर स्टब्सची अखेरीस तुफानी फटकेबाजी

SCROLL FOR NEXT