Jamkhed municipality has started catching pigs 
अहिल्यानगर

जामखेडच्या इतिहासात पहिल्यांदाच असं घडतंय; डुक्करांचा त्रास कमी करण्यासाठी तामिळनाडुची मदत

वसंत सानप

जामखेड (अहमदनगर) : गेली अनेक वर्षांपासून जामखेडकर शहरातील डुक्करांच्या मुक्त संचाराने त्रस्थ झाले होते. अनेकदा डुक्करांचा बंदोबस्त करा, या मागणीने जोर धरला होता. मात्र पांढऱ्या काँलरच्यापुढे हा आवाज हवेतच विरला. आता मात्र जामखेड नगरपलिकेने स्वच्छतेचा कामात अडथळा ठरणाऱ्या या मोकाट डुक्करांचा बंदोबस्त करण्याचा 'वीडा' उचलला असून याकरिता तामिळनाडू येथील २५ निष्णांत लोकांच्या पथकाला पाचारण केले आहे. प्रत्यक्ष कार्यवाही सुरू झाली आहे. अशा पध्दतीनी जामखेडच्या इतिहासात पहिल्यांदाच कार्यवाही होताना पहायला मिळत आहे. त्यामुळे यापुढे डुक्करांच्या मुक्तसंचारापासून जामखेडकरांना सुटका मिळेल हे मात्र निश्चित !

या पथकाला दररोज 150 डुक्करे पकडण्याचे उद्दिष्ट असून हे काम सलग पंधरा दिवस चालणार आहे. त्यामुळे पंधरा दिवसांत जामखेड शहर डुक्कर मुक्त होणार आहे. आज सुमारे 150 डुक्करे पकडण्याचे उद्दिष्ट पूर्ण केले. 'स्वच्छ जामखेड; सुंदर जामखेड' मोकाट डुक्करांचा बंदोबस्त करण्यासाठी तामिळनाडू येथील पथकामार्फत पंधरा दिवसांत संपूर्ण डुक्करे पकडून योग्य ठिकाणी त्यांची विल्हेवाट लावण्यात येणार आहे. मात्र ही कार्यवाही केवळ अभियानापूर्तीच मर्यादित न ठेवता कायमस्वरूपी बंदोबस्त करणारी ठरावी, अशी नागरिकांची मागणी आहे.

स्वच्छ सर्वेक्षण २०२१ मध्ये जामखेड नगरपालिकेने सहभाग घेतला आहे. याकामी आमदार रोहित पवार व त्यांच्या मातोश्री सुनंदाताई पवार हे सर्वोतोपरी सहकार्य व पुढाकार घेतले आहे. शासकीय यंत्रणेसोबत निमशासकीय व व्यापारी व नागरिकांचा सहभागही मिळतो आहे. तसेच स्वच्छता मोहीमही सुरू आहे. 

लक्षवेधी काम सुरू आहे. 

जामखेड नगरपालिकेच्या हद्दीत मोठ्या प्रमाणावर मोकाट डुक्करांचा वावर आहे. अनेक वेळा या डुक्करांनी लहान मुलांवर प्राणघातक हल्ले केलेले आहेत.  अनेक तक्रारी याबाबत होत्या, तसेच ही डुक्करे शहरात मोठ्या प्रमाणावर घाण करतात. याचा नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. 

डुक्करे सोडणारे शहरातील काही प्रतिष्ठित लोक आहेत. पण ते पुढे येत नव्हते. आता नगरपालिकेने डुक्करे पकडण्याची व त्यांची विल्हेवाट लावण्याची मोहिम सुरू केल्याने डुक्करांचे मालक खडबडून जागे झाले आहेत व आम्ही आमची डुक्करे पकडून नेतो असे सांगत आहेत.

तुम्ही तुमचे डुक्करे पकडून घेऊन जा. शहरात एकही डुक्कर दिसता कामा नये. आमची सलग १५ दिवस मोहिम सुरू राहणार आहे व शहर डुक्कर मुक्त करणार आहोत.
- मिनीनाथ दंडवते,मुख्याधिकारी, जामखेड नगरपालिका.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran-Israel War: इराणने इस्रायलचं कंबरडं मोडलं! 'हेर' तयार करणारी फॅक्टरी क्षेपणास्त्राने उडवली

Mumbai Local: लोकलचे वेळापत्रक कोलमडणार, 'या' मार्गावर 'जम्बो ब्लॉक' घेण्यात येणार; कधी आणि कुठे? वाचा सविस्तर

Otur road accident news: ओतूरमध्ये खड्डे चुकवताना ट्रक–स्कुटी अपघात; स्नेहल अहिनवे जागीच ठार

Thane Accident: कल्याणमध्ये भीषण अपघात, टेम्पोची दुचाकीला जोरदार धडक; एकाचा मृत्यू

"दारूमुळे नाटक इंडस्ट्री बरबाद झाली" अभिनेते सुनील तावडेंनी व्यक्त केली खंत "मी अत्यंत तिरस्कार..."

SCROLL FOR NEXT