Jamkhed is threatened by the people of Pune and Mumbai 
अहिल्यानगर

कोरोनामुक्त जामखेडला सोयरे, चाकरमान्यांचा धोका

वसंत सानप

जामखेड : जामखेड शहर कोरोनामुक्त झाले खरे; मात्र या पुढील काळात कोरोनाचे समूळ उच्चाटन करण्याचे मोठे आव्हान जामखेडकारांसमोर निर्माण झाले आहे. ते मुंबई -पुणेवरून येणाऱ्या तालुक्यातील चाकरमान्यांमुळे दररोजचा येणारा ओघ पाहून हे संकट अधिक 'गडद' होऊ लागले आहेत. त्यामुळे ग्रामीण भागात भितीचे वातावरण वाढू लागले आहे.

या चाकरमान्यांना त्यांच्या मूळ गावी क्वारंटाईन करण्याऐवजी जामखेड येथेच क्वारंटाईन करण्याची व्यवस्था प्रशासनाने करावी अन्यथा ग्रामीण भागात याचा फैलाव झाल्यास तो रोखणे मोठे अवघड होईल ; अशी स्थिती आहे . 
या संदर्भात अधिक माहिती अशी जामखेड शहरांमध्ये 17 कोरोनाबाधित व्यक्ती आढळल्या. त्यापैकी एकाचा मृत्यू झाला.
 तर 16 जण कोरोना मुक्त झाले. यामध्ये तब्बल दोन महिन्याचा कालावधी जामखेडकरांचा 'हॉटस्पॉट' मध्ये गेला . त्यामुळे त्रस्त झालेले जामखेडकर कोरोनामुक्त होण्यासाठी एकजुटीने लढले.  

प्रशासनाने अधिक जबाबदारीने काम केले. त्यामुळे जनता व प्रशासनाच्या एकजुटीचा हा विजय ठरला आहे. मात्र, जामखेड कोरोनामुक्त झाल्याचे वृत्त राज्यभरात सर्वदूर पसरले. तालुक्यातून व्यवसायानिमित्त व नोकरीनिमित्त स्थलांतरित झालेले चाकरमाने पुन्हा जामखेडकडे आकर्षित झाले आहेत. त्या ठिकाणी वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन या चाकरमान्यांनी गड्या रे आपला गाव बरा ; असे म्हणत गावची वाट धरली. परवानग्या घेऊन ही मंडळी गावावर येत असली तरी त्यांना 14 दिवस त्यांच्या गावी क्वारंटाईन करण्याच्या प्रशासनाने ग्रामसुरक्षा समितीला सूचना केल्या आहेत.

ग्रामीण भागांमध्ये सुविधांचा असलेला अभाव नागरिकांना क्वारंटाइन करण्यासाठी अडसर ठरतो आहे. हे लक्षात घेऊन तालुका प्रशासनाने राज्याच्या विविध भागातून येणाऱ्या बरोबरच खास मुंबई पुण्यावरून येणाऱ्या चाकरमान्यांसाठी क्वारंटाईन करण्याकरिता जामखेड शहरांमध्ये उपलब्ध असलेल्या मंगल कार्यालय, शाळा, महाविद्यालय यांचा आधार घेऊन त्यांना कोरोंटाईन करावे, त्यांच्यावर  नियंत्रणासाठी विशेष अधिकारी कर्मचाऱ्यांची टीम नियुक्त करावी आणि चौदा दिवसानंतर त्यांना आपल्या मूळ गावाची वाट दाखवावी, असे केल्यास या मुंबई-पुण्यावरून येणाऱ्या व्यक्तीच्या माध्यमातून ग्रामीण भागात कोरोनाचा प्रादूर्भाव होणार नाही.

या संदर्भात तहसीलदार विशाल नाईकवाडे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी यासंदर्भात  निर्णयाला दुजोरा दिला आहे. तसेच तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुनील बोराडे यांच्या मते ग्रामीण भागामध्ये पुरेशा सुविधा या नागरिकांना देता येणार नाहीत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain Alert : पुढचे २४ तास महत्त्वाचे मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता

Kasba Ganpati Pune: पुण्यातल्या कसबा गणपती मंडळाकडून दिलगिरी व्यक्त; विसर्जन मिरवणुकीला १३४ वर्षांत पहिल्यांदाच उशीर

IND vs WI : शुभमन गिलची विंडीज मालिकेतून माघार? मोहम्मद सिराजच्या वेगवान चेंडूवर दुखापत; BCCI च्या डॉक्टरांची पळापळ

Nepal PM: संयुक्त राष्ट्रांच्या अधिवेशनात नेपाळच्या पंतप्रधानांची जागतिक व्यवस्थेवर जोरदार टीका; भारताचाही उल्लेख

PM Kisan 24th Installment : पीएम किसानच्या २४व्या हप्ता ऑक्टोबरमध्ये मिळणार? शेतकऱ्यांना प्रतीक्षा; दसऱ्यापूर्वी खात्यात जमा होण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT