लॉकडाउन ई सकाळ
अहिल्यानगर

जामखेडमध्ये होणार दहा दिवसांसाठी लॉकडाउन

महसूल आणि पोलिस प्रशासनाने घेतला निर्णय

वसंत सानप

जामखेड : शहरात कोरोनाबाधितांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. परिस्थिती बिकट होत असताना आज प्रांताधिकारी अर्चना नष्टे यांच्या उपस्थितीत व्यापाऱ्यांसमवेत पार पडलेल्या बैठकीत, शहरात 10 ते 20 मेदरम्यान कडकडीत "जनता कर्फ्यू' सर्वांच्या संमतीने जाहीर करण्यात आला.

या वेळी प्रांताधिकारी अर्चना नष्टे, तहसीलदार विशाल नाईकवाडे, मुख्याधिकारी मिनीनाथ दंडवते, पोलिस निरीक्षक संभाजी गायकवाड, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते सूर्यकांत मोरे, सुरेश भोसले, सामाजिक कार्यकर्ते रमेश आजबे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष मंगेश आजबे यांच्यासह व्यापारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. (Jamkhed will be locked down for ten days)

जामखेड शहरात कोरोना संसर्गाचा वेग झपाट्याने वाढत असताना, मृत्यूंच्या संख्येतही वाढ होत आहे. शासनाने संचारबंदी लागू केली असली, तरी काही प्रमाणात शिथिलता दिली आहे. जामखेडकरांकडून शासनाच्या सौजन्याचादेखील गैरफायदा घेतला जात असून, रस्त्यावर गर्दी होत असल्याने उद्देश सफल होत नाही. त्यामुळे शहरातील स्थानिक व्यापाऱ्यांच्या पुढाकाराने प्रांताधिकारी अर्चना नष्टेंच्या उपस्थितीत "जनता कर्फ्यू' पाळण्याचा निर्णय सर्वानुमते झाला.

कृषी सेवा केंद्रे व किराणा दुकानांसाठी बाहेरगावांहून माल घेऊन येणाऱ्या मालवाहतुकीच्या मोठ्या वाहनांना माल उतरविण्यासाठी सवलत देण्यात आली आहे. उद्या (शनिवार) व रविवारी सकाळी सात ते अकरा वाजेपर्यंत दुकाने सुरू ठेवण्यात येणार असून, पुढील 10 ते 20 मेदरम्यान अत्यावश्‍यक सेवा दिवसभर व दूधविक्री सकाळी अकरा वाजेपर्यंत सुरू राहणार आहे.

गेल्या वर्षी शहरात कोरोना थोपविण्यासाठी केलेल्या प्रयत्नांना यश आले. मात्र, या वर्षी परिस्थिती भयानक आहे. कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी राजकीय, सामाजिक, व्यावसायिक, व्यापार, उद्योग संघटनांनी स्वयंस्फूर्तीने पुढे येण्याची गरज आहे. दहा दिवस स्वयंस्फूर्तीने "बंद' पाळून "जनता कर्फ्यू'त सहभागी व्हावे, असे आवाहन प्रांताधिकारी अर्चना नष्टे यांनी जनतेला केला आहे.

तालुक्‍यात कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. नागरिकांनी स्वत:च्या कुटुंबीयांची काळजी घ्यावी. मास्क, सॅनिटायझरचा वापर करावा. शासनाच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, तसेच पोलिस प्रशासनाला सहकार्य करावे.

- विशाल नाईकवाडे, तहसीलदार

(Jamkhed will be locked down for ten days)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sachin Yadav: नीरजलाही मागे टाकणारा कोण आहे सचिन यादव? पोलिस भरतीनंतर भालाफेक सोडण्याचा केलेला विचार, पण...

Mamata Banerjee: ८४० कैदी तुरुंगातून मुक्त! विधानसभा निवडणुकीपूर्वी ममता बॅनर्जी यांचा निर्णय, नेमकं कारण काय?

Latest Maharashtra News Updates : पुण्यात मुसळधार पाऊस; बाणेर-औंध रस्ता वाहतुकीसाठी अजूनही ठप्प

Malkapur Accident : भरधाव मारुती इको कारची समोर चालणाऱ्या ट्रेलरला पाठीमागून जोरदार धडक; ५ जणांचा मृत्यू , ४ जण गंभीर जखमी

Chikhali Accident : शिक्षक आमदाराच्या गाडीने तरुणास उडविले; तरुण गंभीर जखमी होऊन सध्या कोमात

SCROLL FOR NEXT