Janardanaswami Maharaj Punyatithi ceremony canceled 
अहिल्यानगर

जनार्दनस्वामी महाराज पुण्यतिथी, अनुष्ठान सोहळा रद्द

मनोज जोशी

कोपरगाव - येथील बेट भागातील राष्ट्रसंत जनार्दन स्वामी (मौनगिरी) महाराज पुण्यतिथी व अनुष्ठान सोहळा चालू वर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्यात आला आहे. 

केवळ पाच भक्त प्रतिनिधी स्वरूपात अनुष्ठानला बसणार आहे. गेल्या पंचवीस वर्षाच्या परंपरेची जपवणूक ट्रस्टच्या वतीने करणार आहे, अशी माहिती राष्ट्रसंत जनार्दन स्वामी समाधी स्थान व काशी विश्वेश्वर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष ह. भ. प. मोहनराव चव्हाण यांनी दिली.

दरवर्षी समाधी स्थळ येथे पुण्यतिथी सोहळा व जपानुष्ठान सोहळा आयोजित करण्यात येतो. सात दिवस चालणाऱ्या जपानुष्ठानाला दरवर्षी एक हजारपेक्षा जास्त भाविक बसतात. राज्यातील विविध जिल्ह्यांतून येणाऱ्या भक्तांसाठी जनार्दन स्वामींच्या शिष्य परंपरेतील संत महंत यांचे कीर्तन, प्रवचन व भजन संध्या आदी कार्यक्रमातून भाविकांना सांसारिक व आध्यात्मिक मार्गदर्शन केले जाते.

सांगता समारंभाला आमटी व भाकरीचा महाप्रसाद वाटप केला जातो. या सोहळ्याला 60 ते 70 हजार भाविक समाधीस्थळी लिन होतात. मात्र, चालू वर्षी कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे व देवस्थान परिसरात गर्दी न करण्याचे शासनाचे निर्देश आहेत. त्या पार्श्वभूमीवर पुण्यतिथी सोहळ्यास दरवर्षी होणारी गर्दी लक्षात घेता खबरदारीचा उपाय म्हणून ट्रस्टच्या वतीने ठराविक भाविकांना अनुष्ठानला बसवणार आहेत. 

गेल्या पंचवीस वर्षांची परंपरा जपणूक करणार असल्याचे चव्हाण यांनी सांगितले. सामाजिक अंतर व शासकीय नियमांचे पालन करून दर्शन सुरू ठेवणार असल्याचे त्यांनी सांगितले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Election Commission of India : SIR वरून निवडणूक आयोगात मतभेद?, आयोगाकडून स्पष्टीकरण; दोन आयुक्तांनी १० महिन्यांत १४ वेळा आक्षेप घेतल्याचा दावा

Job Fair: दहावी पास तरुणांना LIC सह १८ कंपन्यांत थेट मुलाखतीतून नोकरीची संधी! फक्त एकच अट, कसा करायचा अर्ज ?

Ausа Drought Crisis : देवाभाऊ, शेतकऱ्यांसाठी देवदूत बना! दुष्काळात होरपळलेल्या शेतकऱ्यांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टाहो

Marathi News Live Updates : मतांची चोरी हा भारतीय जनतेविरुद्धचा गुन्हा आणि संविधानावरील थेट हल्ला : राहुल गांधी

Devendra Fadnavis Drought Tour : दुष्काळावर सरकारचा ॲक्शन प्लॅन; मुख्यमंत्र्यांची लातुरात कर्जमाफी, पाणी आणि मदतीबाबत मोठी घोषणा !

SCROLL FOR NEXT