MLA Nilesh Lanke
MLA Nilesh Lanke sakal
अहमदनगर

जनता दरबारात ३५६ प्रश्न निकाली

सकाळ वृत्तसेवा

पारनेर : आमदार नीलेश लंके यांच्या संकल्पनेतून आज भरविण्यात आलेल्या जनता दरबारात विविध विभागांतर्गत जनतेचे 536 प्रश्न दाखल झाले, त्यांपैकी 356 प्रश्न मार्गी लागले. कोरोनामुळे दोन वर्षे जनता दरबार बंद होता. राज्य सरकारने कोरोनाचे निर्बंध उठविल्यानंतर आज आंबेडकर स्मारकात सर्व विभागांच्या प्रमुख अधिकाऱ्यांसमवेत भरविण्यात आलेल्या पहिल्याच जनता दरबारात अनेकांच्या तक्रारींचा निपटारा करण्यात आला.जनता दरबारात महसूल, पोलिस, आरोग्य, तसेच भूमिअभिलेख व महावितरण विभागातील तक्रारींचा मोठ्या प्रमाणावर निपटारा करण्यात आला.

आमदार लंके यांच्या संकल्पनेतून जनतेचे मूलभूत प्रश्न मार्गी लागण्यासाठी प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी जनता दरबाराचे आयोजन होते. मात्र, कोरोनामुळे जनता दरबार बंद पडला होता. आजच्या जनता दरबारात 536 तक्रारींपैकी 356 तक्रारींचे निवारण करण्यात आले.तहसीलदार शिवकुमार अवलकंठे, गटविकास अधिकारी किशोर माने, तालुका आरोग्य अधिकारी प्रकाश लाळगे, सहायक निबंधक गणेश आवटी, महावितरणचे अभियंता प्रशांत आडभाई, एसटीचे पराग भोपळेंसह अनेक अधिकारी उपस्थित होते. सुदाम पवार, जितेश सरडे, नगराध्यक्ष विजय औटी, उपनगराध्यक्ष सुरेखा भालेकर, अर्जुन भालेकर, नगरसेवक नितीन अडसूळ उपस्थित होते.

आमदार लंके यांच्या संकल्पनेतून जनतेचे मूलभूत प्रश्न मार्गी लागण्यासाठी प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी जनता दरबाराचे आयोजन होते. मात्र, कोरोनामुळे जनता दरबार बंद पडला होता. आजच्या जनता दरबारात 536 तक्रारींपैकी 356 तक्रारींचे निवारण करण्यात आले.तहसीलदार शिवकुमार अवलकंठे, गटविकास अधिकारी किशोर माने, तालुका आरोग्य अधिकारी प्रकाश लाळगे, सहायक निबंधक गणेश आवटी, महावितरणचे अभियंता प्रशांत आडभाई, एसटीचे पराग भोपळेंसह अनेक अधिकारी उपस्थित होते. सुदाम पवार, जितेश सरडे, नगराध्यक्ष विजय औटी, उपनगराध्यक्ष सुरेखा भालेकर, अर्जुन भालेकर, नगरसेवक नितीन अडसूळ उपस्थित होते.जळीतग्रस्ताला मदत गुढीपाडव्याच्या दिवशी बाभूळवाडेतील मारुती जगदाळे यांच्या घराला आग लागल्याने जीवनावश्यक सर्व वस्तू जळून खाक झाल्या. ही बाब जितेंद्र सरडे यांनी आमदार लंकेंच्या निदर्शनास आणून देताच त्यांनी तातडीने दहा हजारांची मदत नीलेश लंके प्रतिष्ठानतर्फे दिली. तसेच, संसारोपयोगी वस्तूही देण्यात येणार असल्याचे जाहीर केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RTE Admission : आरटीईनुसार २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेशाचे अर्ज भरण्याची प्रक्रिया तात्पुरती बंद

SRH vs LSG Live Score : पूरन अन् बदोनीनं लखनौला पोहचवलं 165 धावांपर्यंत

Sakal Vidya : स्पर्धा परीक्षा व करिअर अभ्यासक्रमाबाबत चिंचवडमध्ये येत्या रविवारी तज्ज्ञांचे मार्गदर्शन

BG Kolse Patil : ‘पंतप्रधानांना ३०० कोटींचा हिशोब द्यावा लागेल’; माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील यांची टीका

Country Cricket : भांडण बीसीसीआय अन् पीसीबीचं; तिकडं इंग्लंड क्रिकेट बोर्डाचे ह्रदयाचे ठोके का वाढले?

SCROLL FOR NEXT