Jhaware did not become the Speaker due to political squabbles 
अहिल्यानगर

राजकीय पाकिटमारीमुळे झावरेंना सभापती करता नाही आले, लंकेंची खंत

सनी सोनावळे

टाकळी ढोकेश्वर ः ""माजी आमदार नंदकुमार झावरे यांनी तालुक्‍यात आदर्शवत काम केले. त्यांचा वारसा 
माजी सभापती राहुल झावरे पुढे चालवत आहेत. पारनेर तालुक्‍यात अनेकांची जी राजकीय दुकानदारी व पाकिटमारी चालू आहे, ती बंद करणार आहोत. या राजकीय पाकिटमारीमुळे झावरे यांना सभापती करता आले नाही, ही खंत आहे,'' अशी भावना आमदार नीलेश लंके यांनी आज व्यक्त केली. 

ढवळपुरी येथे 25 हजार मेंढ्यांसाठी लसीकरण मोहिमेचा प्रारंभ राहुल झावरे यांच्या हस्ते झाला. त्या वेळी लंके बोलत होते.

तालुक्‍यातील अनेक मोठे नेते "राष्ट्रवादी'त येण्यास इच्छुक असल्याचे सांगत लंके म्हणाले, ""के. के. रेंजमध्ये ढवळपुरी परिसरातील एक इंचही जागा जाऊ देणार नाही. यासाठी मी लढा देण्यास नेहमी उभा आहे. कष्टकरी धनगर समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी काम करणार आहे.'' 

झावरे म्हणाले, ""लंके यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तालुक्‍यातील सामान्य लोकांना किराणावाटपसह इतर उपक्रम राबवून आधार दिला. त्यांची आणि आमची नाळ सामान्य जनतेशी जोडली आहे. आम्ही तालुक्‍याच्या विकासासाठी एकत्र काम करणार आहोत.'' 

ते मोठे नेते कोण

पारनेर तालुक्यात सध्या राष्ट्रवादीत इन्कमिंंग सुरू आहे. आमदार नीलेश लंके यांचे नेतृत्व मान्य करीत बहुतांशी लोकांनी राष्ट्रवादीची वाट धरली आहे. शिवसेनेचेही पाच नगरसेवक माजी आमदार विजय अौटी यांचे नेतृत्व डावलून राष्ट्रवादीत आले होते. परंतु त्यांना राज्यस्तरीय घडामोडींमुळे पुन्हा शिवबंधन बांधावे, ही घटना ताजी असताना आमदार लंके यांनी मोठे नेते राष्ट्रवादीत येण्यास तयार असल्याचे सांगितले. त्यामुळे मोठे नेते कोण अशा चर्चेला उत आला आहे.

संपादन - अशोक निंबाळकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Alephata News : ‘जीव देऊ, पण वडिलोपार्जित जमीन नाही’; कल्याण-लातूर महामार्गाला माळवाडी ग्रामस्थांचा विरोध, शासन-शेतकरी संघर्ष पेटण्याची चिन्हे

9 September 2026 Numerology Prediction : 9 सप्टेंबरचा दुर्मिळ योग! सूर्य, मंगळ अन् बुधाच्या कृपेने 'या' 3 मूलांकांना मिळणार बंपर पैसा, नव्या संधींचे मार्ग होणार खुले?

मानसवेध : मानसिक ताकद वाढविण्यासाठी

Soyabean Medu Vada: घरात उडीद डाळ नाही? टेन्शन नको! 10 मिनिटांत बनवा सोयाबीनपासून मेदू वडा; जाणून घ्या रेसिपी

Pune Crime : 'कुराश' खेळांच्या बनावट प्रमाणपत्रांचे रॅकेट राज्यभर पसरलेले; एक हजाराहून अधिक बोगस प्रमाणपत्रे वाटली

SCROLL FOR NEXT