Kalbhairav ​​Jayanti Dipotsav was celebrated in Akole 2.jpg 
अहिल्यानगर

अकोले येथे कालभैरव जयंती दीपोत्सव साजरा

शांताराम काळे

अकोले (अहमदनगर ) : येथील पुरातन सिद्धेश्वर शिवालय परिसरातील काळभैरव देवस्थान मंदिरात कालभैरव जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. कार्तिक मास अष्टमीचे औचित्याने दीपोत्सव पार्श्वभूमीवर आकर्षक रोषणाईने परिसर उजळून निघाला होता.
 
विख्यात हार्मोनियम वादक मुकुंद पेटकर आणि त्यांच्या परिवाराच्या मार्गदर्शन - नियोजनाने भाविकांकडून मंदिरात आणि पुरातन पायऱ्यांवर बहुसंख्य पणत्यांची नयनसुखद, दैदिप्यमान रोषणाई, आकर्षक विशाल रांगोळीसह करण्यात आली होती.

हे ही वाचा : संगमनेर : बदलत्या हवामानात जमिनीतील सेंद्रिय कर्बाचे संवर्धन गरजेचे
 
लोकदेवता आणि लोकसंस्कृतीचे अभ्यासक डॉ. सुनील शिंदे कालभैरवाचे वैशिष्ट्य सांगताना म्हणाले, कालभैरव शक्तीपीठाचा रक्षक मानला जातो. शक्तीपीठांच्या ठिकाणी भैरवाचे अस्तित्व समजले जाते. अकोलेतील या मंदिरात भैरव आणि अंबिकेची मूर्ती प्रतिष्ठित आहे. काळभैरी, मार्तंड भैरव, रवळनाथ, मल्हारी अशीही अन्य नावे काळभैरवास आहेत. सायंकाळी सामुदायिक कालभैरव अष्टक स्तोत्र पठणाने उपक्रमाची सांगता झाली.

संपादन - सुस्मिता वडतिले  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

OBC आरक्षणात मोठा बदल! दोन महत्त्वाची विधेयके विधानसभेत मंजूर; नव्या कायद्याला हिरवा कंदील, कुणी घेतला निर्णय?

पुणेकरांनो लक्ष द्या! संत ज्ञानेश्वर पालखी सोहळ्यादरम्यान वाहतुकीत मोठे बदल; कोणते मार्ग बंद राहणार?

Europe Heatwave: युरोपची लाहीलाही! उष्णतेच्या लाटेत होरपळले अनेक देश, १८ शहरांना रेड अलर्ट; फ्रान्समध्ये ५ दिवसात १ हजार मृत्यू

Latest Marathi News Live Update: पश्चिम बंगाल सार्वजनिक सुरक्षा आणि समाजकंटक कारवायांवरील नियंत्रण विधेयक २०२६ विधानसभेत मंजूर

Water Palaces: ऐतिहासिक सौंदर्याचा नजराणा ! भारतातील ५ सर्वात सुंदर 'वॉटर पॅलेस' पाहिलेत का ?

SCROLL FOR NEXT