Rohit Pawar esakal
अहिल्यानगर

कर्जत-जामखेडला मिळणार लाल दिवा

मतदारसंघात साेशल मीडियात सुरू आहे रोहित पवार यांच्‍या मंत्रिपदाची चर्चा

सकाळ वृत्तसेवा

कर्जत : राज्य मंत्रिमंडळात आमदार रोहित पवार यांचा समावेश होणार, या बातमीने समाजमाध्यमावर धुमाकूळ घातला आहे. राष्ट्रवादीचे पदाधिकारी याबाबत गप्प आहेत. राज्याच्या मंत्रिमंडळाचा लवकरच छोटा विस्तार होणार आहे. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसची मंत्रिमंडळात एक जागा रिक्त आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसकडून ही जागा भरली जाणार आहे. येत्या हिवाळी अधिवेशनाच्या आधीच हा विस्तार होऊ शकतो व त्यात कर्जत- जामखेडचे आमदार रोहित पवार यांना स्थान मिळू शकते, अशी जोरदार चर्चा सुरू आहे. तसेच त्यांना थेट कॅबिनेट मंत्रिपदाची संधी मिळू शकते, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली.माजी मंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्यानंतर गृह विभागाची धुरा दिलीप वळसे पाटील यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. त्यामुळे वळसे पाटील यांच्याकडे पूर्वी असलेली कामगार कल्याण आणि उत्पादन शुल्क ही खाती रोहित पवार यांच्याकडे दिली जाण्याची शक्यता आहे. तसेच, काही दिवसांपूर्वी कोल्हापूरकडे दुर्लक्ष होत असल्याचे कारण देत नगरचे विद्यमान पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी नकार दिल्याचे कळतेय. त्यामुळे पालकमंत्रिपदाची जबाबदारीही रोहित पवार यांच्याकडे सोपविली जाण्याची शक्यता सूत्रांनी वर्तविली.

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा तथा ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे नातू रोहित पवार यांच्यावर असलेले प्रेम आणि लक्ष हे सर्वश्रुत आहे. त्यामुळेच विधानसभा निवडणुकीत प्राधान्य देत प्रचाराची सांगता सभा त्यांनी भर पावसात कर्जत येथे घेतली होती. तसेच, भरभरून कौतुक करीत, आशीर्वाद देत हा मतदारसंघ विकासाचे मॉडेल होऊन लोक तो बघायला येतील, अशी भविष्यवाणीही केली होती. त्यास पूरक वातावरण दिसत आहे.तसेच शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिसऱ्या पिढीचे वारसदार म्हणून रोहित पवार यांच्याकडे पाहिले जात आहे. तरुण चेहरा, आमदार झाल्यानंतर विकासाच्या कमी कालावधीत साधलेला कर्जत जामखेडचा विकास, राज्यात मिळत असलेली युवा वर्गातील प्रसिद्धी व त्यातून निर्माण झालेली क्रेझ आदी मुद्दे रोहित पवार यांच्या जमेच्या बाजू आहेत.

राजकीय विश्‍लेषकांचा कयास

आमदार रोहित पवार यांचा मंत्रिमंडळात समावेश झाल्यास कर्जत नगरपंचायत, जामखेड नगरपरिषद, तसेच उंबरठ्यावर असलेल्या बाजार समिती, जिल्हा परिषद-पंचायत समितीच्या निवडणुकीत पक्षाला घवघवीत यश मिळू शकते, असा राजकीय धुरिणांचा कयास आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Narayan Rane : दोन्ही शिवसेना युतीला राणेंचा विरोध, शिंदे गटाशी संबंध तोडण्याचा इशारा

Panchang 9 November 2025: आजच्या दिवशी ‘श्री सूर्याय नमः’ या मंत्राचा जप करावा

Pune Land Scam : पार्थ पवारांचे नाव पुढे आल्यावर शरद पवारांची मोठी मागणी; 'मुख्यमंत्र्यांनी पुणे जमीन गैरव्यवहाराची चौकशी करून वस्तुस्थिती मांडावी

Sunday Morning Breakfast Recipe: रविवारी सकाळच्या नाश्त्यात झटपट बनवा चवदार ठेचा सँडविच, सोपी आहे रेसिपी

विश्वविजेत्या नवदुर्गा

SCROLL FOR NEXT