Karjat Municipal Corporation elections will be fought independently 
अहिल्यानगर

कर्जत पालिकेची निवडणूक वंचित बहुजन आघाडी स्वबळावर लढणार

नीलेश दिवटे

कर्जत : नगरपंचायतीची आगामी निवडणूक स्वबळावर लढविण्याचा निर्णय वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष सोमनाथ भैलुमे यांनी आज जाहीर केला. 
वंचित बहुजन आघाडीची विशेष बैठक प्रल्हाद कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. तीत हा निर्णय घेण्यात आला.

भारतीय बौद्ध महासभेचे तालुकाध्यक्ष पनाजी कदम, वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा संघटक नंदकुमार गाडी, चंद्रकांत नेटके, भारतीय सत्यशोधक समाजाचे प्रमुख कार्यकर्ते प्रा. विक्रम कांबळे, माजी पोलिस निरीक्षक मिलिंद मयूर, नितीन थोरात, अनिल समुद्र, तुकाराम पवार यांच्यासह अनेक पदाधिकारी व प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते. 

सोमनाथ भैलुमे म्हणाले, ""नगरपंचायत कोण्या एका पक्षाची मक्तेदारी नाही. सत्ताधारी पक्षाने चांगला कारभार केला नाही. सत्ताधारी कोण आणि विरोधक कोण, हेच जनतेला पाच वर्षे समजले नाही. जनतेच्या प्रश्नांवर विरोधी पक्षांनी कधी आवाज उठवला नाही. विरोधक सत्ताधाऱ्यांच्या मांडीला मांडी लावून बसल्याचे चित्र सातत्याने दिसत होते.'' 

""नागरिकांना त्यांच्यासाठी काम करणारे नगरसेवक हवे आहेत. त्यामुळे समाजहितासाठी कार्य करणारे सतरा नगरसेवक जनतेने कल्पकतेने निवडून द्यावेत, यासाठी वंचित बहुजन आघाडी निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे. या वेळी आमदार- खासदार विरुद्ध वंचित सामान्य जनता, असा लढा राहणार आहे,'' असे ते म्हणाले. मयूर ओहोळ यांनी आभार मानले. 

संपादन - अशोक निंबाळकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Book Festival: पुस्तक महोत्सवात ५० कोटींची उलाढाल; ३० लाखांपेक्षा जास्त पुस्तकांची विक्री, साडेबारा लाख नागरिकांनी दिली भेट

Pune Accident: 'अक्कलकोटचे मायलेक रेल्वेच्या धडकेत ठार'; पिंपरी-चिंचवडमधील घटना, अंत्यविधीसाठी गावी गेले अन्..

Maharashtra Cold Wave : पुणे, कोल्हापूर, साताऱ्यासह विदर्भात थंडीचा कडाका वाढणार, किमान तापमान ८.६ अंशांवर; हवामान विभागाचा अंदाज समोर

‘परफेक्ट लूक’चा अट्टहास; देशात सौंदर्योपचारांची झपाट्याने वाढ, वर्षभरात १२.८८ लाख प्रक्रिया

Latest Marathi News Live Update : शिवाजी विद्यापीठाच्या ६२ व्या दीक्षान्त समारंभ सोहळ्याला आजपासून होणार प्रारंभ

SCROLL FOR NEXT