Karjat Rohit Pawar's state-of-the-art Covid Center with 40 beds, oxygen facility 
अहिल्यानगर

कोरोनाशी लढूना ः कर्जतला पवारांचे ४० बेडचे अत्याधुनिक कोव्हिड सेंटर, अॉक्सिजनचीही सुविधा

दत्ता उकिरडे

राशीन : कर्जत येथील उपजिल्हा रुग्णालयात अत्याधुनिक ४० बेडचे कोव्हीड सेंटर कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांच्या सृजन संस्थेमार्फत सुरू करण्यात आले आहे. या कोव्हीड सेंटरचे उद्घाटन दिवंगत डॉ. विलास काकडे यांच्या पत्नी विद्या काकडे व डॉ.रोहित काकडे व कुळधरण येथील दिवंगत डॉ. प्रशांत जगताप यांच्या मातोश्रीच्या हस्ते करण्यात आले.

विशेष म्हणजे सुरू करण्यात आलेल्या या कोव्हीड सेंटरमध्ये कोरोना रुग्णांसाठी ऑक्सिजनचीदेखील व्यवस्था करण्यात आली आहे. या उद्घाटनप्रसंगी प्रांताधिकारी अर्चना नष्टे, उपविभागीय पोलिस अधिकारी संजय सातव, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संदीप पुंड, वैद्यकीय अधिकारी डॉ. सुचेता यादव, तहसीलदार नानासाहेब आगळे, गटविकास अधिकारी अमोल जाधव, मुख्याधिकारी गोविंद जाधव यांच्यासह विविध अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.

कर्जत तालुक्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. तालुक्यातील विविध ठिकाणी कोरोना रुग्ण आढळून येत आहेत. या पार्श्वभूमीवर आमदार रोहित पवार यांनी पुढाकार घेत कर्जत येथील उपजिल्हा रुग्णालयाच्या परिसरात नवीन ४० बीडचे ऑक्सिजन सुविधेसह सुसज्ज असलेले कोव्हीड सेंटर सुरू केले आहे.

ग्रामीण भागामध्ये अशा प्रकारे आधुनिक सेंटर कोठेही नाही आणि कर्जतसारख्या ग्रामीण भागामध्ये हे आमदार रोहित पवार यांनी सुरू करून सर्व समान्यांना दिलासा दिला आहे. कोरोनाच्या रुग्णांना अत्यावश्यक सुविधा आता कर्जत या ठिकाणीच मिळणार असल्याने तालुक्यातील नागरिकांकडून विशेष कौतुक केले जात आहे.

यावेळी आ.पवार म्हणाले,'सुरू करण्यात आलेले हे कोव्हीड सेंटर रुग्णांसाठी खुप गरजेचे आहे. आता अत्यावश्यक रुग्णांना ऑक्सिजन सुविधाही पुरवण्यात येईल. हे कोव्हीड सेंटर सुरू करण्यासाठी सर्व डॉक्टर्स, अधिकारी यांनी मोलाचे सहकार्य केले आहे. कोरोना या जीवघेण्या आजारांपासून नागरिकांचे संरक्षण व्हावे या हेतूने हे सेंटर निर्माण केले आहे.

संपादन - अशोक निंबाळकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Share Market : भारतीय शेअर बाजाराची तेजीने सुरुवात; सेन्सेक्सने ओलांडला ८२६०० चा टप्पा, निफ्टीतही ७८ अंकांची वाढ

PM Narendra Modi : पंतप्रधान मोदींचा पगार ऐकून थक्क व्हाल; पगाराशिवाय आणखी काय मिळतं त्यांना? जाणून घ्या सुविधा आणि एकूण संपत्ती

Marathwada Mukti Sangram Din : ..अन् मराठवाडा भारतात विलीन झाला! खेडोपाडी कशी झाली क्रांती? जाणून घ्या रक्तरंजित इतिहास

PM Narendra Modi lifestyle: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दिनक्रम कसा असतो? जाणून घ्या त्यांच्या लाइफस्टाइलविषयी!

Asia Cup 2025: जसप्रीत बुमराह पुढची मॅच नाही खेळणार; महत्त्वाचे अपडेट्स, IND vs OMN सामन्यात Playing XI कशी असणार?

SCROLL FOR NEXT