Karjat-Shrigonda water is distributed to only thirteen employees 
अहिल्यानगर

"घोड"चे पाणीवाटप चालते अवघ्या तेरा कर्मचाऱ्यांवर

संजय आ. काटे

श्रीगोंदे : घोड प्रकल्पातील कालवे, वितरिकांची दुरुस्ती नसतानाच काही वर्षांत अधिकारी व कर्मचाऱ्यांचे रिक्त पदांचे ग्रहण लागले आहे. सध्या "घोड'मध्ये बोटावर मोजण्याएवढेच नियमित कर्मचारी आहेत. इतरांना उसनवारीवर घेऊन आवर्तन सुरू आहे. या गोंधळात शेतकऱ्यांशी अधिकारी व कर्मचाऱ्यांचा संवाद राहिला नाही. श्रीगोंदे व कर्जत तालुक्‍यांचे सिंचन तेरा कर्मचारी तीन वर्षांपासून करीत आहेत.

श्रीगोंदे, कर्जत तालुक्‍याला पाणी देणाऱ्या डाव्या कालव्यावर नियमानुसार 110 अधिकारी व कर्मचारी पदांची संख्या आहे. प्रत्यक्षात केवळ तेरा लोक असून, ही अवस्था तीन वर्षांपासून आहे. मढेवडगाव उपविभागाच्या माध्यमातून असणाऱ्या पाच शाखांमध्ये आजच्या घडीला पाच शाखाधिकारी पदे आहेत. तेथील सर्व पदे रिक्त आहेत. वीस कालवा निरीक्षक हवेत; मात्र आहेत केवळ दोन. मोजणीदार, मजूर ही महत्त्वाची पदे धूळ खात आहेत. वर्षापासून उपअभियंता हे पदही रिकामे आहे. दोन तालुक्‍यांना जोडणारा 84 किलोमीटर अंतराच्या कालव्यावर बडे बागायतदार आहेत.

काष्टी, वांगदरी ही नेत्यांची गावे आणि नागवडे व अंबालिका साखर कारखाना याच कालव्यावर आहे. सध्या सुरू असणारे उन्हाळी आवर्तन कमालीचे वादग्रस्त ठरले. कर्जत तालुक्‍यातील सिंचन पायथ्याला असल्याने अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मोठी मेहनत घेतली. मात्र, श्रीगोंद्याच्या हद्दीत पाणी आले की गोंधळ सुरू झाला. वीजपंपावर कारवाई करताना थेट कालव्यातून पाणी वाहून नेणारे पाइप मात्र बिनधास्त सुरू राहिले. त्यातच काही वितरिका शेतकऱ्यांनी बळजबरीने खोलल्या. त्यातून संघर्ष झाला आणि दोन दिवस गुन्हे दाखल झाले. शेतकऱ्यांच्या दगडफेकीतून उद्रेकही समोर आला. 

सध्या जे अधिकारी व कर्मचारी आहेत, त्यांच्यातडून वरिष्ठांना काम करून घ्यावे लागते. त्यातच अनेक कर्मचारी कुकडी उपविभागातून आले आहेत. त्यांनी सवयीप्रमाणे "घोड'च्या शेतकऱ्यांकडे अपेक्षेने पाहणे सुरू केले आणि त्यातून वाद सुरू झाले. घोड प्रकल्पात नियमित अधिकारी, कर्मचाऱ्यांची भरती न झाल्यास हा प्रकल्प लवकरच बंद पडेल. अहमदनगर

धरणात 360 दशलक्ष घनफूट वापरायोग्य पाणी शिल्लक आहे. गरज पडल्यास ज्या वितरिका राहिल्या आहेत. तेथे बांध टाकून पाणी बंद करू. नियमित अधिकारी व कर्मचारी नसल्याने आवर्तनात अडचणी येतात. 
- बी. आर. देशमुख, प्रभारी उपअभियंता, घोड डावा कालवा 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

State Government : मंत्रिमंडळाचा निर्णयांचा धडाका; निवडणूक आचारसंहितेपूर्वी घेतले २१ निर्णय

Maharashtra Governance : कायद्याबाहेरील कलमांवर दिला हद्दपारीचा आदेश; विभागीय आयुक्तांनी उपजिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय केला रद्द!

Sakal Karandak : पुणे विभागातून ‘बीएमसीसी’ महाअंतिम फेरीत सकाळ करंडक; विभागीय अंतिम फेरीचा समारोप

PMC elections : महापालिका निवडणुकीच्या मतदार यादीच्या वेळापत्रकात बदल; ६ ऐवजी १४ नोव्हेंबरला प्रारुप मतदार यादी जाहीर होणार!

ODI Record: भारतीय वंशाच्या क्रिकेटरचा अमेरिकेसाठी पराक्रम; विराटलाही मागे टाकत वनडेमध्ये रचला विश्वविक्रम

SCROLL FOR NEXT