Karjat taluka journalists also rushed to the aid of the poor 
अहिल्यानगर

कर्जत तालुका पत्रकारही धावले गरिबांच्या मदतीला...आठ पोती धान्याचे वाटप

सकाळ वृत्तसेवा

कर्जत : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बहुतांशी मजुरांची तसेच गोरगरिबांची उपासमार होते आहे. त्यांच्या मदत करण्यासाठी देश-विदेशातून देशवासीय पुढे सरसावले आहेत. कोरोनाची अचूक माहिती लोकापर्यंत जावी,  यासाठी प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी जीव धोक्यात घालून रिपोर्टिंग करीत आहेत. कर्जत तालुका पत्रकार संघाचे पदाधिकारी, सदस्यही अग्रेसर आहेत. मदतीचे वार्तांकन करतानाच त्यांनी स्वतःही मदतीचा हात पुढे केला आहे. आपल्या मदतीमुळे गोरगरिबांच्या मुखात दोन घास जावेत, ही त्यामागची भूमिका आहे.

सावता परिषदेच्या महिला प्रदेशाध्यक्षा मनीषा सोनमाळी यांनी मोफत अल्पोहार केंद्र सुरू केले आहे. त्या केंद्रास पत्रकार संघाच्या पदाधिकाऱ्यांनी आठ पोती गहू आणि तांदूळ दिले. यावेळी तालुका पत्रकार संघाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. 

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कर्जत शहरात दवाखाना आणि बॅंकेच्या कामकाजासाठी येणाऱ्याची संख्या मोठी आहे. लॉकडाऊनमुळे शहरातील सर्वच दुकाने बंद असल्याने त्यांची मोठी गैरसोय होत आहे. याच अनुषंगाने शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात सावता परिषदेच्या महिला प्रदेशाध्यक्षा मनिषा सोनमाळी यांनी मोफत अल्पोहार केंद्र सुरू केले होते. या केंद्रातून अनेक गरजवंत कुटुंब आणि नागरिक आपली भूक भागवत आहेत. याच सामाजिक जाणिवेतून आज तालुका पत्रकार संघाच्या वतीने या अल्पोहार केंद्रास आठ पोती गहू आणि तांदूळ देण्यात आले.

यावेळी अध्यक्ष मुन्ना पठाण, उपाध्यक्ष मोतीराम शिंदे, सचिव मच्छिंद्र अनारसे, कार्याध्यक्ष नीलेश दिवटे, खजिनदार डॉ. अफरोजखान पठाण, सल्लागार गणेश जेवरे, सुभाष माळवे, आशिष बोरा, केंद्रचालक तथा सावता परिषदेच्या महिला प्रदेशाध्यक्षा नगरसेविका मनिषा सोनमाळी, सचिन सोनमाळी, अंकुश भोज आदी उपस्थित होते.

सध्या कोरोना मुळे शहरात सोनमाली यांचे मोफत अल्पोहार केंद्र सुरू आहे त्याचा मोठा आधार त्यांना मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर कर्जत तालुका पत्रकार संघाच्या सर्वच पदाधिकारी यांनी केंद्रास मदत देण्याचा विचार केला होता. त्याप्रमाणे आज गहू आणि तांदूळ यांची आठ पोती केंद्रास देण्यात आले. 
- मुन्ना पठाण, 
अध्यक्ष, तालुका पत्रकार संघ, कर्जत. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भाजप कार्यकर्त्याची जेवणासाठी हाणामारी, आमदारांनी घेतलेल्या बैठकीनंतर एकमेकांच्या अंगावर गेले धावून; VIDEO VIRAL

Solapur Pune Highway Accident : ओव्हरटेक करताना कंटेनरला धडक, स्कॉर्पिओचा चुराडा; २२ वर्षीय तरुणाचा मृत्यू, दोघे गंभीर

CNG PNG Supply : सीएनजी-पीएनजी पुरवठ्याला गती; पुणे, पिंपरीमधील गॅस वितरण व्यवस्था अधिक सक्षम

विद्यानंद बापट यांचा २२ वर्षांपूर्वी उदय सामंत यांनी केलेला सत्कार; फोटो होतोय VIRAL

IIT Bombay Hostel: विद्यार्थ्याने गळफास घेतल्यानंतर 'आयआयटी'कडून मोठं पाऊल; छतावील पंख्यांऐवजी भिंतीवरील पंखे मागवले

SCROLL FOR NEXT