pm kisan kyc
pm kisan kyc esakal
अहमदनगर

पीएम किसान साठी 'ई-केवायसी' बंधनकारक

सकाळ वृत्तसेवा

अहमदनगर : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पीएम किसान) पोर्टलवरील नोंदणीकृत पात्र लाभार्थ्यांना एप्रिल-जुलै २०२२ च्या मुदतीपूर्वी ३१ मार्च २०२२ पर्यंत ''ई-केवायसी'' पूर्ण करणे बंधनकारक असल्याचे, जिल्हा समन्वय अधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित यांनी सांगितले.विशेष जनजागृती मोहिम राबवून राज्यातील सर्व पात्र लाभार्थ्याना ई-केवायसी करण्यासाठी ओटीपी किंवा बायोमॅट्रिक हे पर्याय उपलब्ध करून दिलेले आहेत. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पीएम किसान ) https://pmkisan.gov.in या संकेतस्थळावर किंवा पी. एम. किसान अॅपद्वारे ओटीपी प्राप्त करून लाभार्थीना स्वतः ई-केवायसी प्रमाणीकरण मोफत करता येईल.

ग्राहक सेवा केंद्रावर ई-केवायसी प्रमाणीकरण बायोमॅट्रिक पद्धतीने करता येईल. केंद्र शासनाकडून ग्राहक सेवा केंद्रावर बायोमॅट्रिक पद्धतीने ई-केवायसी प्रमाणीकरण करण्यासाठी प्रती लाभार्थी प्रती बायोमॅट्रिक प्रमाणीकरण दर निश्चित करण्यात आला आहे, असे त्यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा लाभ जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांना मिळत आहे. बहुतेक शेतकऱ्यांना कागदपत्रांची पूर्तता किंवा केवायसी बाबतच्या अडचणींमुळे या योजनेचा लाभ घेता आला नाही. नव्याने केवायसी दाखल केल्यानंतर पुढील कार्यवाही होणार आहे. तसेच संबंधित शेतकऱ्यांना लाभ मिळेल. आॅनलाईन वेबसाईटच्या माध्यमातून हे प्रमाणीकरण करणे सोपे आहे. बहुतेक नवोदित शेतकरी या पोर्टलचा वापर सहज करू शकतात. ज्या शेतकऱ्यांना याबाबत अडचणी येतील, त्यांनी संबंधित सेतूशी संपर्क करावा.

१५ रुपयांत होणार केवायसी

शेतकऱ्यांनी आॅनलाईन केवायसी सादर करताना संबंधित संकेतस्थळावरून करणे आवश्यक आहे. तथापि, ज्या शेतकऱ्यांना तसे शक्य नाही, त्यांनी जवळील सेतू केंद्रातून भरून घेता येईल. त्यासाठी केवळ १५ रुपये शुल्क आकारण्यात येणार आहे. जास्त रक्कम शेतकऱ्यांनी देऊ नये, तसेच असे आढळल्यास तक्रार दाखल करता येईल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar : तुम्ही दहा वर्षांत काय केले हे पाहा; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टोला

ED : ‘ईडी’वर अंकुश! न्यायप्रविष्ट प्रकरणांत आता थेट अटक होणार नाही

Loksabha Election 2024 : मुंबईत आज ‘महासंग्राम’; सांगता सभांमुळे राजकीय तापले वातावरण

Sugar : केंद्र सरकारच्या बंदीमुळे साखर होणार ‘तिखट’; ९० लाख टन साखर अतिरिक्त ठरण्याची शक्यता

अग्रलेख : ‘आप’ भी...?

SCROLL FOR NEXT