crime  sakal
अहिल्यानगर

Latur Crime: जमिनीच्या वादातून दोन गटात हाणामारी; कुऱ्हाड, सत्तूर, कोयत्याने हल्ला, एकाचा मृत्यू

तिघे गंभीर जखमी; नऊ जणांविरुद्ध गुन्हा

रुपेश नामदास

लातूर: शिराळा (ता. लातूर) येथे भावकीतील जमिनीच्या वादाचे पर्यवसान शुक्रवारी (ता. पाच) रात्री दोन गटातील हाणामारीत झाले. या घटनेत एका गटाने दुसऱ्या गटावर कुऱ्हाड, सत्तूर, कोयता व लोखंडी रॉडने हल्ला केला.

यात एकाचा जागीच मृत्यू झाला असून, तिघेजण गंभीर जखमी झाले आहेत. घटनेनंतर मुरुड (ता. लातूर) पोलिसांनी तातडीने धाव घेत जखमींना रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. या प्रकरणी नऊ जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून, पोलिसांनी चौघांना ताब्यात घेतले आहे.

मुरुडचे सहायक पोलिस निरीक्षक धनंजय ढोणे यांनी सांगितले, की शिराळा येथे मनोहर काळे व धनराज काळे यांच्या कुटुंबांत जमिनीचा वाद सुरू आहे. जमिनीच्या वाटणीवरून कुटुंबांत सतत वादाची ठिणगी पडते. दोन वर्षांपूर्वीही कुटुंबांत वाद झाला होता.

शुक्रवारीही पुन्हा वाद झाला. शुक्रवारी रात्री धनराज काळे हे त्यांचे ट्रॅक्टर चालवत घराकडे येत होते. चिंचोली रस्त्यावरील घरासमोर येताच संशयित आरोपी बाळासाहेब मनोहर काळे यांच्यासह नऊ जणांनी धनराज काळे यांचे ट्रॅक्टर अडवून त्यांच्यावर कुऱ्हाड, सत्तूर, कोयता व लोखंडी रॉडने हल्ला केला.

यात धनराज काळे (वय ४३) यांचा जागीच मृत्यू झाला. या हाणामारीत धनराज काळे यांचे पुतणे अमोल भास्कर काळे व ऋषिकेश काळे गंभीर जखमी झाले. घटनेनंतर गावातील कोणीही मदतीला पुढे आले नाही. काहींनी पोलिसांना या घटनेची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी धाव घेत जखमींना रुग्णालयात उपचारासाठी पाठवले.

हाणामारीत आरोपींपैकी एकजण जखमी झाला आहे. या प्रकरणी अमोल काळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी बाळासाहेब मनोहर काळे, गोपाळ काळे, मनोहर व्यंकट काळे, राजाभाऊ काळे, कविता बाळासाहेब काळे, अनिता काळे, ओम राजाभाऊ काळे, संभाजी बाळासाहेब काळे व गणेश बाळासाहेब काळे (सर्व रा. शिराळा) यांच्याविरुद्ध खून, खुनाचा प्रयत्न व अन्य आरोपाखाली गुन्हा दाखल केला आहे.

यातील चौघांना पोलिसांनी ताब्यात घेतलल्याचे श्री. ढोणे यांनी सांगितले. उपविभागीय पोलिस अधिकारी सुनील गोसावी यांनी घटनास्थळी भेट देत तपासाच्या सूचना दिल्या आहेत. सहायक पोलिस निरीक्षक ढोणे तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Teacher Recruitment: महाराष्ट्रात शिक्षकांची भरती कधी होणार? निवृत्ती वयाबाबत मोठं वक्तव्य करत शिक्षण मंत्र्यांनी तारीखच सांगितली!

IND vs ZIM, T20 WC: हार्दिक पांड्याचे सलाम-ए-इश्क! दोन षटकार.. शेवटच्या चेंडूवर फिफ्टी.. माहिका शर्माला फ्लाइंग Kisssss Video Viral

IND vs ZIM, T20 WC: अभिषेक शर्माला सूर गवसला, भारताने उभारली वर्ल्ड कपमधील सर्वोच्च धावसंख्या; २००७ चा विक्रम मोडला

Khamgaon Crime : सख्ख्या भावाचा खून करून मृतदेह जाळला व राख फेकली नदीत; राहुड येथील घटना, दोन्ही आरोपीस अटक

Pune Property Tax: पुण्यात ५०० चौरस फुटांच्या आतील घरांना करमाफी मिळणार का? विरोधकांची तयारी मात्र भाजपनेच...

SCROLL FOR NEXT