Lawyers' petition for financial assistance in court 
अहिल्यानगर

वकील भाऊसाहेबांची खंडपीठात याचिका...कशासाठी, वाचा तर खरं...

सकाळ वृत्तसेवा

नेवासे : कोरोनातील लॉकडाउनमुळे अनेकांचे रोजगार गेले. बरेचशे अन्नालाही मोताद झाले.वकील भाऊसाहेबांनाही याचा फटका बसला आहे. त्यांनी तर थेट सरकारकडे ५० हजारांची आर्थिक मदत मागितली आहे.

कोरोनामुळे दोन महिन्यांपासून सर्व न्यायालये बंद आहेत. त्यामुळे कनिष्ठ वकिलांना किमान प्रत्येकी 50 हजार रुपये मदत महाराष्ट्र व गोवा वकील परिषद आणि सरकारने संयुक्तरीत्या देण्याची मागणी करणारी याचिका नेवासे वकील संघाने मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाखल केली आहे. संघाचे अध्यक्ष अॅड. वसंत नवले यांनी ही माहिती दिली. 

याचिकेवर मंगळवारी (ता. 5) व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे पहिली सुनावणी झाली. कोरोनामुळे मागील दोन महिन्यांपासून लॉकडाउनदरम्यान सर्व न्यायालये बंद आहेत. त्यामुळे वकिलांवरही उपासमारीची वेळ आली आहे. वकिलांना कोणतेही आर्थिक संरक्षण नाही, तसेच पुढील सहा महिने तरी त्यांना पक्षकारांकडून फी मिळण्याची शाश्वती नाही.

या सर्व बाबींचा विचार करून गरजू व कनिष्ठ वकिलांना प्रत्येकी 50 हजार रुपयांची आर्थिक मदत मिळावी. महाराष्ट्र व गोवा वकील परिषद, तसेच राज्य सरकारने ही मदत करावी, अशी मागणी याचिकेत केली आहे. 

लॉकडाउन झाल्यापासून न्यायालये बंद असल्याने, ज्युनिअर वकील आर्थिक कोंडीत सापडले आहेत. त्यांना सरकार आणि महाराष्ट्र व गोवा वकील परिषदेने आर्थिक मदत करावी, यासाठी ही याचिका दाखल केल्याचे अॅड. नवले यांनी सांगितले. 

47 वकिलांना किराणा साहित्याचे वाटप 
महाराष्ट्र व गोवा वकील परिषदेतर्फे नेवासे न्यायालयातील नव्याने सराव करणाऱ्या 47 वकिलांना प्राथमिक स्वरूपाची मदत म्हणून दीड हजार रुपयांपर्यंतच्या किराणा साहित्याचे वाटप करण्यात आले. मात्र ही मदत तुटपुंजी असल्याने उत्पन्नाचे दुसरे कोणतेही साधन नसलेल्या ज्युनियर वकिलांना या काळात महाराष्ट्र व गोवा वकील परिषदेकडून आर्थिक मदतीची खरी गरज आहे, अशी अपेक्षा अनेक वकिलांनी व्यक्त केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

चंद्रनाथ रथ कोण होते? हवाई दलाची नोकरी सोडून बनले सुवेंदू अधिकारी यांचे विश्वासू; भवानीपूर मतदारसंघाची होती जबाबदारी

अक्षय कुमार हॉस्पिटलमध्ये भरती, शूटिंगदरम्यान अक्षय कुमारच्या प्रकृतीत बिघाड? शस्त्रक्रिया पार, नक्की झालं तरी काय?

Pune Crime: मुलीवरील अत्याचारप्रकरणी कठोर कारवाई करा: उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे,आरोपीला जामीन न मिळावा अशी सरकारकडे मागणी

Solapur Crime: भांडीसंचासाठी मागितली लाच; कंत्राटी दोन ऑपरेटर जेरबंद, माढा तालुक्यातील उपळाई बुद्रूक येथील घटना!

Latest Marathi News Live Update : गांधीनगर मार्गावरील बेकायदा बांधकामे महापालिका उद्यापासून पाडणार : आयुक्‍त

SCROLL FOR NEXT