Legal action against this sugar factory for arrears 
अहिल्यानगर

थकीत कर्जापोटी "या' साखर कारखान्यावर कायदेशीर कारवाई

सकाळ वृत्तसेवा

नगर : ""डॉ. बाबूराव बापूजी तनपुरे सहकारी साखर कारखान्यास वेळोवेळी शेतकरीहिताचा विचार करून अहमदनगर जिल्हा सहकारी बॅंकेने कर्जापोटी अटी शिथिल केल्या. मात्र, अद्याप कारखान्याने कराराप्रमाणे 41 कोटी 32 लाख 10 हजार रुपयांचा भरणा केलेला नाही. त्यामुळे कर्जात आणखी वाढ झाली असून, कर्जाच्या थकाबाकीपोटी आता कारखान्यावर कायदेशीर कारवाई करणे आवश्‍यक आहे,'' अशी माहिती बॅंकेचे अध्यक्ष सीताराम गायकर व माजी मंत्री शिवाजी कर्डिले यांनी पत्रकाद्वारे दिली. 

सन 2012-13 मध्ये तनपुरे कारखान्याकडील कर्जाची थकबाकी वाढल्याने खाते एनपीएमध्ये गेले होते. बॅंकेने थकबाकीचा वारंवार तगादा लावूनही कारखान्याने भरणा केला नाही. बॅंकेने थकबाकी वसुलीसाठी कायदेशीर कारवाई करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार कारखान्यास नोटीस दिली. तथापि कारखान्याने रकमेचा भरणा न केल्याने कारखाना जप्त करून बॅंकेच्या ताब्यात घेतला. त्यानंतर कार्यक्षेत्रातील शेतकऱ्याच्या ऊसगाळपाची गैरसोय होऊ नये, म्हणून बॅंकेने थकबाकीसह एकूण 90 कोटी दोन लाख 82 हजार कर्ज रक्कम विचारात घेऊन कर्जाचे पुनर्गठन करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर कारखाना चालविण्यासाठी संचालक मंडळाच्या ताब्यात देण्यात आला. मात्र, कारखान्याकडून अद्याप अटींची पूर्तता झाली नाही. त्यामुळे तनपुरे कारखान्यावर कायदेशीर कारवाई आवश्‍यक असल्याचे पत्रकात म्हटले आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup: पुन्हा तोच ड्रामा! हरमनप्रीतच्या टीम इंडियानेही मोहसिन नक्वीच्या हातून नाकारली ट्रॉफी; Final नंतर काय घडलं?

IND vs AFG: अभिषेक शर्माचं शतक हुकलं, पण 'असा' पराक्रम करणारा पहिलाच भारतीय ठरला! आंद्रे रसेलला टाकलं मागं

Asia Cup 2026 Final: भारतीय संघ आठव्यांदा चॅम्पियन! फायनलमध्ये श्रीलंकेला पराभूत करत जिंकले विजतेपद

IND vs AFG, 1st T20I: ७ सिक्स अन् ७ फोर... अभिषेक शर्माचं वादळ घोंगावलं, पण शतक हुकलं! भारताचा १४ ओव्हरमध्येच दणदणीत विजय

Pune Navale Bridge : पुण्यातील नवले पुलाजवळ अभिनेत्रीसोबत धक्कादायक प्रकार; आधी गाडीला धडक अन् मग हात ओढून पळवून नेण्याचा प्रयत्न

SCROLL FOR NEXT