Leopards at the city gates 
अहिल्यानगर

मॉर्निंग वॉकला जाताय, सावधान... बिबट्या आला नगरच्या गावकुसाला

सकाळ वृत्तसेवा

नगर ः नगर जिल्ह्याच्या उत्तर भागात बिबट्याचे वास्तव्य आहे. तो लोकांच्या वस्तीजवळच रहिवास करतो. शेतकऱ्यांवर हल्ला केल्याच्या बातम्या कायम येत असतात. मात्र, शहरी लोक त्याकडे दुर्लक्ष करतात. परंतु बिबट्या थेट नगर शहराच्या वेशीवर येऊन धडकला आहे. सहा महिन्यांपूर्वी तो एमआयडीसी परिसरात आला होता. नेमके एका कंपनीतील सीसीटीव्ही फुटेजमध्ये तो कैद झाल्याने वन विभागानेही त्याची नोंद केली.  

अहमदनगर शहरातील अभिजित पाडळकर, पराग गावडे, प्रवीण राठोड यांच्यासह काही जण आज (रविवारी) सुटी असल्याने चांदबीबी महाल परिसरात फिरायला गेले होते. महालाजवळ त्यांना मोराचा मनमोहक आवाज ऐकू आला. त्यांचे पाय आपसूक आवाजाच्या दिशेने वळले.

 रस्त्यापासून अवघ्या 200 फुटांवर त्यांना मोर दिसला. मोराजवळ पोचताच, करवंदाच्या जाळीत मोराच्या शिकारीसाठी दबा धरून बसलेला बिबट्या त्यांना दिसला. जास्त माणसांना पाहून, डरकाळी फोडून बिबट्याने धूम ठोकली. 

व्याघ्र संरक्षण समिती सदस्य मंदार साबळे यांना याबाबत माहिती देण्यात आली. त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत, ही माहिती जिल्हा उपवनसंरक्षक आदर्श रेड्डी व वनपरिक्षेत्र अधिकारी एन. बी. पोकळे, वनपरिक्षेत्र अधिकारी, फिरत्या पथकाचे सुनील थिटे यांना दिली. वन विभागाचे पथकही तातडीने घटनास्थळी आले. साबळे यांनी घटनास्थळाची पाहणी केली. तेथे बिबट्याच्या पायांचे ठसे दिसून आले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND: आकाश दीपने १० विकेट्ससह विक्रम कामगिरी बहिणीला केली समर्पित! कारणही आहे खूपच भावूक

CA Result: ‘सीए’च्या अंतिम परीक्षेत छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा देशात प्रथम; १४ हजार २४७ उमेदवार पात्र ठरले

WTC Points Table: टीम इंडियाने इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या कसोटीतील विजयासह उघडलं गुणांचं खातं! जाणून घ्या टीम कोणत्या क्रमांकावर

Pune Viral Video: इंजिनिअरिंगमध्ये 3 वेळा नापास, तरुणाची पुण्यातील राजाराम पुलावरून नदीपात्रात उडी, व्हिडिओ व्हायरल

ENG vs IND: शुभमन गिलच्या टीम इंडियाने इतिहास रचला, ५८ वर्षांत पहिल्यांदाच बर्मिंगहॅममध्ये फडकवली विजयी पताका

SCROLL FOR NEXT