Lesson taught to those who steal water from Kukdi canal 
अहिल्यानगर

(video) "कुकडी' कालव्यातून पाणीचोरी करणाऱ्यांना असा शिकवला धडा.. 

संजय आ. काटे

श्रीगोंदे (अहमदनगर): "कुकडी' प्रकल्पातून सोडण्यात येणाऱ्या आवर्तनातील पाण्याची गळती रोखण्यासाठी कालव्याचे भराव फोडून टाकलेले पाइप काढण्याची मोहीम जलसंपदा विभागाने राबविण्यास सुरवात केली आहे. पोलिस बंदोबस्तात सुरू असणाऱ्या या कामात पाइपांची संख्या मोठी असल्याने हे काम करताना कर्मचाऱ्यांच्या नाकीनव आले असले, तरी एकही पाइप ठेवायचा नाही, असा निर्धार कर्मचाऱ्यांनी केला आहे. 

"कुकडी'च्या डाव्या कालव्यातून काही बडे शेतकरी (त्यात नेत्यांचाही समावेश) पाणीचोरी करीत असल्याचा आरोप आमदार बबनराव पाचपुते व प्रा. तुकाराम दरेकर यांनी केला होता. त्यामुळे विशेषत: तालुक्‍याच्या पायथ्याला असणाऱ्या वितरिकांना पुरेशा दाबाने पाणी मिळत नसल्याचे आरोप झाले होते. त्यामुळे जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता स्वप्निल काळे यांनी वरिष्ठांकडून विशेष मंजूरी घेऊन कालव्यावरील पाइप काढण्यासाठी पोलिस बंदोबस्त मागवून घेतला.

मोठ्या पाइपामुळे काम जिकिरीचे

कालव्याचे भराव फोडून अनेकांनी पाणीउपसा करण्यासाठी असे पाइप टाकले आहेत. हे सगळे पाइप काढण्यासाठी पोकलॅन कामाला लावले. काही अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या देखरेखीखाली हे काम सुरू आहे. पाइपांची संख्या जास्त असल्याने व अनेक ठिकाणी मोठ्या आकाराचे पाइप असल्याने हे काम जिकिरीचे झाले आहे. मात्र, तरीही अधिकाऱ्यांच्या सक्त सूचना असल्याने पाइप काढण्याचे काम जोरात सुरू होते. 

बंदोबस्तासाठी पोलिसांचा फौजफाटा

कालव्याच्या दोन्ही बाजूंच्या भरावात बुजलेले पाइप काढताना तेथील शेतकऱ्यांनी विरोध केला, तर त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी पोलिसांचा फौजफाटा आहे. हे पाइप काढताना अनेक शेतकऱ्यांच्या वितरिकांना असणारे पाइपही काढले, तर शेवटच्या शेतकऱ्याला पाणी मिळेल, असा आग्रह अधिकाऱ्यांकडे धरल्याचे समजते. 

पाझर तलावांच्या पाण्याबाबत फेरविचार : काळे 

कार्यकारी अभियंता काळे म्हणाले, ""कालव्यावरील बेकायदा पाइप काढण्याचे काम सुरू असून, लवकरच ते संपेल. सोबतच आता काही ठिकाणी वितरिकांनाही पाइप टाकल्याच्या तक्रारी आल्या आहेत, तेथेही कारवाई होईल. दरम्यान, कुकडी प्रकल्पात केवळ विसापूर हा एकच पाणी देण्याचा तलाव आहे. इतर तलावांना टंचाईच्या काळात पाणी देण्याचा नियम आहे. शिवाय इतर कुठलेही पाझरतलाव कुकडी प्रकल्पात समाविष्ट नाहीत. ते केवळ कमांडमध्ये आहेत. त्यामुळे येणाऱ्या आवर्तनात पाझर तलावांना पाणी देताना नियम व वरिष्ठांशी चर्चा करुन निर्णय करणार आहोत.'' 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shubman Gill: 'किंग' कोहलीकडून 'प्रिन्स'चं भरभरून कौतुक! म्हणाला, 'स्टार बॉय, तू इतिहास...'

Latest Maharashtra News Live Updates: पाण्यात अडकलेल्या तरुणाची रेस्क्यू टीमने केली सुटका

Weekly Horoscope: या आठवड्यात गुरु-आदित्य योगामुळे 'या' 5 राशींवर धनवर्षा, बँक खात्यात होईल मोठी भर, जाणून घ्या तुमचं करिअर राशीभविष्य

Maharashtra Rain News: राज्यात पुढचे ४ दिवस मुसळधार, पहा कुठे -कोणता अलर्ट? | Weather Alert

Video : “...अन् साक्षात पांडुरंगाचं दर्शन झालं”, पंढरपूरला निघालेल्या दिव्यांग आजोबांचा वारीतला व्हिडिओ पाहून शॉक व्हाल..

SCROLL FOR NEXT