MLA Monica Rajale Google
अहिल्यानगर

सणासुदीला तरी मंदिरे उघडू द्या : आमदार मोनिका राजळे

सकाळ डिजिटल टीम


अमरापूर (जि. नगर) : ‘‘राज्यातील धार्मिक स्थळे व मंदिरांवर अवलंबून असलेल्या व्यावसायिकांच्या व भाविकांच्या हिताचा विचार करून सण- उत्सवांच्या काळात तरी राज्य सरकारने मंदिरे उघडू द्यावीत,’’ असे आवाहन आमदार मोनिका राजळे यांनी केले.


आव्हाणे बुद्रुक (ता. शेवगाव) येथील स्वयंभू निद्रिस्त गणपती देवस्थानासमोर भाजपच्या वतीने, राज्यातील मंदिरे उघडावीत, या मागणीसाठी आज (सोमवारी) घंटानाद आंदोलन करण्यात आले. यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे, तालुकाध्यक्ष ताराचंद लोढे, जिल्हा उपाध्यक्ष वाय. डी. कोल्हे, किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष कचरू चोथे, युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष उमेश भालसिंग, तालुका सरचिटणीस भीमराज सागडे, महिला आघाडीच्या तालुकाध्यक्षा आशा गरड आदी प्रमुख उपस्थित होते.


आमदार राजळे म्हणाल्या, ‘‘मागील दोन वर्षांपासून कोरोनामुळे राज्यातील धार्मिक स्थळे बंद आहेत. त्यामुळे त्यावर अवलंबून असलेल्या व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ आली आहे. कोरोनाविषयक सर्व नियम व अटींचे पालन करून देवस्थाने उघडण्यास परवानगी देण्यात यावी.’’ यावेळी राहुल बंब, रामदास कोळगे, बाळासाहेब डोंगरे, सोमनाथ कळमकर, मंगेश पाखरे, अशोक गाढे, मीना कळकुंबे, महादेव पाटेकर, संदीप वाणी, संतोष डुरे, अनिल खैरे, संदीप कळमकर, रामनाथ काकडे, केशव महाराज आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


मंदिराचे पावित्र्य जपण्यास शिका

भाजपने केलेले घंटानाद आंदोलन म्हणजे मतदारसंघातील मूलभूत प्रश्नांपासून जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी लोकप्रतिनिधींनी केलेला राजकीय स्टंट आहे. त्यामुळे मंदिरासमोर चपला व बूट घालून आंदोलन करणाऱ्यांनी आधी मंदिराचे पावित्र्य जपायला शिकावे, अशी टीका राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष संजय कोळगे यांनी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: पुण्यात 'जय गुजरात'ची घोषणा; मुंबईत सारवासारव, अमित शहांसमोर दिलेल्या नाऱ्यावर एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया

MP Naresh Mhaske : अर्बन नक्षल घुसखोरीवरून पुरोगामी नेत्यांची कोल्हेकुई; नरेश म्हस्केंची घणाघाती टीका

Loan Penalty: आरबीआयकडून मोठा दिलासा! आता कर्जाच्या प्री-पेमेंटवर दंड भरावा लागणार नाही, नियम कधीपासून लागू होणार?

Georai Crime : गायरान जमिन का कसता? असे म्हणून अदिवासी कुटुंबीयाना कु-हाडीने मारहाण; वडिलांसह माय-लेकी गंभीर जखमी

Latest Maharashtra News Updates : ज्वेलर्सचे सुरक्षा रक्षक भटक्या कुत्र्यांनी केलेल्या हल्ल्यात गंभीर जखमी

SCROLL FOR NEXT