Nagar
Nagar sakal
अहमदनगर

पैशाच्या वादातून खून करणाऱ्यास जन्मठेप

सकाळ वृत्तसेवा

अहमदनगर : घर बांधण्यासाठी हातउसने दिलेले एक लाख रुपये मागितल्याचा राग आल्याने मित्राचा खून केल्याबद्दल कृष्णा रघुनाथ गायकवाड (वय ३०, हल्ली रा. सावेडी) यास जन्मठेप आणि एक हजार रुपये दंडाची शिक्षा जिल्हा सत्र (Court) न्यायाधीश एम. आर. नातू यांनी ठोठावली.

बाळासाहेब अंबादास इथापे यांची नगर-मनमाड महामार्गावर पद्मावती पेट्रोलपंपाशेजारी चहाची टपरी होती. ते कुटुंबीयांसह या ठिकाणी राहत होते. त्यांच्या शेजारी कृष्णा गायकवाड (हल्ली रा. सावेडी, मूळ रा. तेलकुडगाव, ता. नेवासे) हा राहत होता. बाळासाहेब इथापे यांचा मुलगा योगेशचा कृष्णा हा मित्र होता. कृष्णा यास घर बांधण्यासाठी योगेशने एक लाख रुपये हातउसने दिले होते. योगेश हा ता. २० जून २०१९ रोजी कृष्णा यांच्या पंक्‍चरच्या दुकानावर पैसे मागण्यासाठी गेला होता. त्यावेळेस कृष्णा याने टॉमीच्या सहाय्याने योगेशला बेदम मारहाण केली. त्यावेळेस बाळासाहेब इथापे हे त्याला सोडविण्यासाठी गेले होते. त्यांनाही ढकलून आरोपी कृष्णा हा टॉमी घेऊन पेट्रोलपंपाच्या मागील बाजूस पळून गेला.

योगेश याला उपचारासाठी सावेडीतील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या उपचारा दरम्यान त्याचा मृत्यू झाला. तोफखाना पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रकाश पाटील यांनी या गुन्ह्याचा तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र पाठविले. सरकारतर्फे आठ साक्षीदार तपासण्यात आले. फिर्यादी, घटनास्थळाचे पंचनामे, वैद्यकीय अधिकारी यांच्या साक्षी महत्वपूर्ण ठरल्या. कृष्णा याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा सिद्ध झाल्याने त्यास जन्मठेप आणि एक हजार रुपये दंड, दंड न भरल्यास सहा महिने सक्‍तमजुरीची शिक्षा ठोठावण्यात आली. जिल्हा सरकारी वकील सतीश पाटील यांनी सरकारतर्फे काम पाहिले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar: "अरे मामा जरा जपून... तुझं सर्व काढायला वेळ लागणार नाही"; इंदापुरात शरद पवारांचा इशारा!

IPL 2024 PBKS vs CSK Live Score : अर्शदीपचा अप्रतिम यॉर्कर अन् रहाणे झाला बाद

Lok Sabha : 'एक भाकरी, एक रूपया द्या.. एका भिक्षुकाला पंतप्रधान करा' म्हणणाऱ्या विजयप्रकाश कोंडेकरांकडे किती आहे संपत्ती?

Latest Marathi News Live Update : राहुल गांधी यांनी वायनाडच्या लोकांशी केलेली फसवणूक - गौरव वल्लभ

South India Travel : उन्हाळ्यातही करू शकता दक्षिण भारताची सफर; जाणून घ्या 'ही' थंड हवेची ठिकाणं

SCROLL FOR NEXT