Loaddown in Kopargaon reduced the incidence of corona infection 
अहिल्यानगर

कोपरगावात लॉडकडाउन पडला अन कोरोना संसर्गाचे प्रमाण घटले

मनोज जोशी

कोपरगाव : तालुक्‍यासह शहरात प्रशासनाने चार दिवस लॉकडाऊन जाहीर केल्याने, कोरोनाबाधितांची संख्या घटली आहे. शहरातील विविध भागात वैद्यकीय पथकांनी काल (ता.30) अखेर 20 हजार 262 नागरिकांचा सर्व्हे केला होता.

आजअखेर शहरात 123 रुग्णांवर उपचार सुरू असून, बरे होण्याचे प्रमाण 83.62 टक्के असल्याची माहिती ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. कृष्णा फुलसौंदर यांनी दिली. 

गेल्या आठवड्यात तालुक्‍यात रोज 50 ते 60 कोरोनाबाधित आढळत होते. त्यामुळे शहरात भितीचे वातावरण पसरले होते. शहरात खरेदी-विक्रीसाठी येणाऱ्या नागरिकांची गर्दी होत होती. त्यामुळे प्रशासनाने चार दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केला. त्यात शहरातील विविध 10 भागांमध्ये वैद्यकीय पथकाने घरोघर सर्व्हे केला.

कालपर्यंत 3404 कुटुंबांची व 20 हजार 262 नागरिकांचा सर्व्हे करण्यात आला. आतापर्यंत तालुक्‍यात कोरोनाबाधितांची संख्या 835 झाली असून, पैकी 715 रुग्ण बरे झाले आहेत. तसेच 17 जणांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण 1.98 टक्के आहे. आज दिवसभरात 37 रुग्णांना घरी सोडण्यात आले. 27 रॅपिड टेस्ट करण्यात आल्या, त्यात सात पॉझिटिव्ह आढळल्याचे डॉ. संतोष विधाते यांनी सांगितले. 

दरम्यान, शहरात लॉकडाऊनचा आज शेवटचा दिवस होता. लॉकडाऊनमुळे रुग्णसंख्या झपाट्याने घटल्याचे पुढे आले. त्यामुळे लॉकडाऊन संपला व आस्थापने, बाजारपेठ सुरू झाली, तरी नागरिकांनी कारणाशिवाय बाहेर पडू नये, असे आवाहन मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांनी केले आहे. 

संपादन - अशोक निंबाळकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PNEUMONIC PLAGUE: रशियातील लॅबमध्ये काम करणाऱ्या तरुणीचा मृत्यू; नक्की काय आहे 'न्यूमोनिक प्लेग'? जाणून घ्या कारणं आणि लक्षणं

Dearness Allowance Hike: कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज! व्हेरिएबल डीए वाढला; नेमका किती आणि कोणाला फायदा होणार?

२ केंद्रीय मंत्र्यांचा पत्ता कट होणार, मोदी कॅबिनेटमध्ये फेरबदलाच्या चर्चांना उधाण; ५ जागा रिक्त, आप-शिवसेनेला संधी?

Australia A विरुद्ध सुरु होणार ODI मालिका! हार्दिक, नमनची माघार; तरीही भारताची तगडी फौज मैदानात; जाणून घ्या डिटेल्स

Pune News : मनोज जरांगे यांना प्रश्‍न विचारल्‍याने ट्रोलधाड; रेखा कोंडे यांचा जरांगेंवर आरोप, टेंडर प्रक्रियेवरून मनोज जरांगे यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

SCROLL FOR NEXT