Ahmednagar cooperative bank sakal media
अहिल्यानगर

जिल्हा बॅंकेचा शेतकऱ्यांना दिलासा; पाच लाखांपर्यंतचे कर्ज बिनव्याजी

दिवाळी सणाच्या तोंडावर शेतकऱ्यांना दिलासा देणारा निर्णय अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने घेतला आहे.

सकाळ वृत्तसेवा

अहमदनगर : दिवाळी सणाच्या तोंडावर शेतकऱ्यांना दिलासा देणारा निर्णय अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने घेतला आहे. शेतकऱ्यांना पाच लाख रुपयांपर्यंतचे अल्पमुदत पीककर्ज शून्य टक्के व्याजदराने देण्याचे आज संचालक मंडळाने जाहीर केल्याचे, बँकेचे अध्यक्ष ॲड. उदय शेळके व उपाध्यक्ष अॅड. माधवराव कानवडे यांनी सांगितले.

शासनाच्या व्याजदराच्या परतावा धोरणानुसार तीन लाख रुपयांपर्यंतचे अल्पमुदत पीककर्ज शून्य टक्के दराने उपलब्ध होत आहे. तीन लाखांपुढील कर्ज मात्र शेतकऱ्यांना प्रचलित व्याजदराने (दहा टक्के) घ्यावे लागत होते. शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने बँक नेहमीच चांगले निर्णय घेत असते. त्याअनुषंगाने आज बँकेच्या संचालक मंडळाच्या सभेत यावर चर्चा झाली. तीन लाखांची मर्यादा वाढविण्यात येऊन ती पाच लाखांपर्यंत करण्यात आली. कर्जाचे व्याज बँकेच्या स्वभांडवलातून देण्याचा निर्णय घेण्यात आला.

आज जिल्ह्यात सेवा संस्थांच्या माध्यमातून सुमारे तीन लाख शेतकरी कर्जदार सभासदांना दोन लाख २४ हजार हेक्टर क्षेत्रासाठी १७२६ कोटींचे कर्जवाटप एकट्या जिल्हा बँकेने केले आहे. विशेष म्हणजे, जिल्ह्यातील ५० ते ६५ टक्के शेतकऱ्यांना या बॅंकेने कर्ज दिले आहे. यातील वेळेत कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकरी सभासदांना या योजनेचा मोठ्या प्रमाणावर लाभ होणार आहे. शेतकऱ्यांनी जिल्हा बँकेच्या माध्यमातून घेतलेल्या सर्व कर्जाची वेळेत परतफेड करून या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन अध्यक्ष ॲड. शेळके यांनी केले.

"शेतकऱ्यांचे हीत जोपासण्याचे काम जिल्हा सहकारी बॅंकेने केले आहे. शेतकऱ्यांना तीन लाखापर्यंत सरकारच्या माध्यमातून शुन्य टक्के व्याजदरावर पिक कर्ज दिले जाते. आता त्यापुढील दोन लाखांना सुद्धा जिल्हा बॅंकेच्यावतीने व्याजात सुट दिली जाईल. म्हणजे पाच लाखांपर्यंत पिक कर्ज बिनव्याजी मिळणार आहे. पुणे, कोल्हापूरमध्येही अशा प्रकारचा निर्णय झाला आहे. शेतकऱ्यांनी याचा लाभ घ्यावा."

- ॲड. उदय शेळके, अध्यक्ष, जिल्हा सहकारी बॅंक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

INDW vs AUSW Live: भारतीय संघाचे T20 World Cup मधून पॅकअप! ऑस्ट्रेलियाचा दणदणीत विजय अन् दक्षिण आफ्रिका उपांत्य फेरीत... हरमनप्रीत कौरच्या संघाला अपयश

IND vs IRE 2nd T20I : आयर्लंडने इतिहास रचला! भारतीय संघाला ट्वेंटी-२० मालिकेत नमवले, श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाची लाजीरवाणी सुरुवात

पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवर वाढला मृत्यूचा धोका! टोल टाळण्यासाठी 'नो-एंट्री'तून वाहनांची सर्रास एंट्री; नियमांना हरताळ

Latest Marathi News Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

Vidarbha Rain Alert : विदर्भासाठी दिलासादायक बातमी! पावसाचा जोर वाढणार, ११ जिल्हे यलो अलर्टवर

SCROLL FOR NEXT