Locals are scared as a tiger was seen on Nagar Nashik Road 
अहिल्यानगर

अरे बापरे ! अहो तो बिबट्या नाही पट्टेरी वाघच

शांताराम काळे

अकोले (अहमदनगर) : नगर नाशिक सरहद्दीवर बिबट्या नव्हे तर चक्क पटेरी वाघ दिसल्याचे प्रत्यक्ष दर्शनी पाहिल्याचे स्थानिक नागरिक व प्रवासी सांगत आहे. तर सोशल मीडियावर देखील या वाघाची जोरदार चर्चा सुरू असून वनविभागास त्या वाघाचा तपास करावा लागेल. अद्याप वाघ आमच्या निदर्शनास आले नसल्याचे त्यांनी सांगितले आहे. 

तालुक्यात नगर पुणे, नगर ठाणे, नगर नाशिक या सरहद्दीवर पट्टेरी वाघ दिसल्याचे अनेकजण सांगतात. त्यापैकी कुमशेत सरपंच सयाजी अस्वले, निसर्ग प्रेमी रमाकांत डेरे, बायफचे विभागीय व्यवस्थापक जितीन साठे, विजय चौधरी, सोमनाथ देशमुख, गौरव कवडे, वासली येथील श्रीरंग दामसे, इंदोरे येथील वस्तीवर राहणारे शेतकरी म्हणता की, तालुक्यात बिबट्या नव्हे तर वाघ दिसला आहे. त्यामुळे चंद्रपूरसारखे हरिश्चंद्र कळसूबाई शिखराच्या जंगलात म्हणजेच अभयारण्यात वाघ दिसला असल्याचा बोलबाला आहे. व ज्यांनी पट्टेरी वाघ पाहिला आहे तेही ठामपणे सांगतात. 

याबाबत वनविभागाचे डी.डी.पडवळ, अमोल आडे, जी.आर. गोंदके यांच्याशी संपर्क केला असता वाघ नसल्याचे सांगितले. मात्र, वनविभागाने ट्रॅप क्यामेरे, पाऊल ठसे, विष्ट, याचे सर्वेक्षण करणे आवश्यक आहे परंतु ते होताना दिसत नाही. अनेक जण वाघ पाहिल्याचे सांगत आहेत. देवठाण, पाडाळने, कुमशेत, बारी घाट वास्ली, महीस वळण घाट, ठाण गाव, सिन्नर अशा वेगवेगळ्या ठिकाणी वाघ दिसल्याची चर्चा तर आहेच. परंतु प्रत्यक्ष दर्शनी पाहणारे डोळे आहेत. याबाबत वनविभाग गप्प का? आपली जबाबदारी झटकता की काय असा प्रश्न वन्य प्रेमींना पडला आहे. हा वाघ एका रात्रीत १०० ते १५० चौ. कि. प्रवास करतो असे वन्य अभ्यासक दातीर यांनी सांगितले. 

संपादन - सुस्मिता वडतिले  
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Power of Simple Living and Discipline : साधं राहणीमान अन् बचतीच्या जोरावर ४५व्या वर्षी निवृत्तीपर्यंत जमवले ४.७ कोटी; जाणून घ्या कसे?

Latest Marathi News Updates : दक्षिण मुंबईतील गणेशोत्सव मंडळांची बैठक सुरु, अडचणींवर व नियोजनाबाबत होणार चर्चा

Video: प्रेमाची तालिबानी शिक्षा! काकाच्या मुलीवर प्रेम जडलं; रागात गावकऱ्यांनी प्रेमीयुगुलांना नांगराला जुंपलं, व्हिडिओ व्हायरल

८ चेंडूंत ६ विकेट्स.. पाच त्रिफळाचीत ! Kishor Kumar Sadhak ने इंग्लंडमध्ये सलग दोन षटकांत घेतल्या दोन Hat-Tricks

Parenting tips: पेराल ते उगवेल, आई वडिलांकडून अशा प्रकारे सवयी शिकतात मुलं

SCROLL FOR NEXT