अहिल्यानगर

Loksabha Election: लोकसभेसाठी २० हजार कर्मचाऱ्यांची गरज! जिल्ह्यात ३ हजार ७३१ मतदान केंद्र, एका केंद्रावर पाच कर्मचारी

केंद्रीय निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार मतदारांना मतदान करण्याच्या प्रक्रियेत सुसूत्रता आणण्यासाठी मतदान केंद्रांची फेररचना केली आहे.

सकाळ डिजिटल टीम

Ahmednagar Electoral Booths: केंद्रीय निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार मतदारांना मतदान करण्याच्या प्रक्रियेत सुसूत्रता आणण्यासाठी मतदान केंद्रांची फेररचना केली आहे. त्यानुसार आता जिल्ह्यात ३ हजार ७३१ मतदान केंद्र राहणार आहेत. प्रत्येक केंद्रासाठी ५ कर्मचारी या प्रमाणे १८ हजार ६५५ कर्मचारी निवडणुकीसाठी लागणार आहेत. मतदान कर्मचाऱ्यांच्या आकृतिबंधाच्या २० टक्के राखीव कर्मचारी ठेवावे लागत असल्याने सुमारे २० हजार कर्मचारी लागणार आहेत.

केंद्रीय निवडणूक आयोगाने एका मतदान केंद्रावर दीड हजारांपेक्षा जास्त मतदार न ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. शहरातील उपनगरांचा विस्तार वाढत आहे. या उपनगरांतील मतदान केंद्रांवरील मतदारांची संख्याही वाढत आहे. तसेच औद्योगिक वसाहतीजवळील गावे, महामार्गांवरील मोठ्या गावांमधील लोकसंख्या वाढल्याने नवीन निकषानुसार सुमारे साडेतीनशे नवीन मतदान केंद्र वाढले आहेत.

एका मतदान केंद्रासाठी एक केंद्र अध्यक्ष, तीन मतदान अधिकारी आणि एक शिपाई, असे ५ कर्मचारी लागतात. जिल्ह्यातील मतदान केंद्रांची संख्या आता ३ हजार ७३१ असून, यासाठी १८ हजार ६५५ कर्मचारी लागणार आहेत. मतदान कर्मचाऱ्यांच्या एकूण संख्येच्या २० टक्के कर्मचारी हे राखीव ठेवावे लागतात. त्यामुळे अडीच हजार अन्य कर्मचारी हे राखीव अथवा बदली कर्मचारी आवश्‍यक आहेत. लोकसभा निवडणुकीसाठी २० हजार कर्मचारी लागणार आहेत. निवडणूक विभागाकडून राज्य शासनाच्या विविध विभागांकडे कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांची माहिती मागविली जात आहे. (Latest Marathi News)

विधानसभा मतदार संघनिहाय मतदार

अकोले २ लाख ५७ हजार ५१९, संगमनेर २ लाख ७५ हजार ८२१, शिर्डी २ लाख ७६ हजार ७२, कोपरगाव २ लाख ७६ हजार ७९१, श्रीरामपूर २ लाख ९८ हजार २३०, नेवासे २ लाख ७१ हजार ६६६, शेवगाव ३ लाख ५६ हजार ४७७, राहुरी ३ लाख ७ हजार ६३२, पारनेर ३ लाख ३७ हजार ७५, अहमदनगर शहर २ लाख ९४ हजार ५८५, श्रीगोंदे ३ लाख २५ हजार ३२ आणि कर्जत-जामखेड ३ लाख ३४ हजार १३३ एकूण ३६ लाख ११ हजार ३३.

सहायक मतदान अधिकाऱ्यांच्या प्रशिक्षणास प्रारंभ

विधानसभा मतदारसंघनिहाय सहायक मतदान अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर महसूल विभागातील ९६ सहायक मतदान अधिकाऱ्यांना छत्रपती संभाजीनगर येथे सोमवार (ता.५) ते गुरुवार (ता. ९) असे पाच दिवस प्रशिक्षण दिले जाणार आहे. या प्रशिक्षणाला प्रारंभ झाला आहे. या अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण झाल्यानंतर ते त्यांच्या कार्यक्षेत्रातील कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देणार आहेत.(Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral Video: तुझ्यापेक्षा जास्त टॅक्स देते, मराठी बोलणार नाही; पुण्यात परप्रांतीय महिलेचा कॅबचालकाशी वाद, व्हिडिओ व्हायरल

Ashadhi Ekadashi Upvas Recipes: आषाढी एकादशी स्पेशल पौष्टिक अन् चविष्ट खास २ उपवासाच्या रेसिपीज; नक्की ट्राय करा

Ladki Bahini Yojana : लाडकी बहीण योजनेतून तुमचंही नाव वगळलं नाही ना? असं करा चेक...

Latest Maharashtra News Live Updates: लांजा तालुक्यातील खोरनीनको धबधबा प्रवाहित

IT Park Kolhapur : कोल्हापुरात आय.टी. पार्कचा मार्ग अजून खडतर, कृषी महाविद्यालयाची मनधरणी करण्यातच जात आहेत दिवस

SCROLL FOR NEXT