Look, Pawar's grandson is driving a rickshaw! 
अहिल्यानगर

Video : बघ बया, पवारसाहेबांचा नातू रिक्षा चालिवतोय!

नीलेश दिवटे

कर्जत ः कर्जत-जामखेड मतदारसंघातील आमदार रोहित पवार हे नेहमी आपल्या वेगळ्या कार्यपद्धतीने चर्चेत असतात. विधानसभेत पाय ठेवताना घेतलेली शपथ असो नाही तर मतदारसंघातील सर्वच गावांतील लोकांना दिलासा मिळावा म्हणून एकाच ठिकाणी केलेली क्वारंटाईनची सुविधा असो. कुकडीचे पाणी असो.

एकंदर त्यांनी काहीही केले तरी चर्चा होतेच. मतदारसंघात यापूर्वी कधीच न झालेली कामेही त्यांनी चुटकीसरशी सोडवली आहेत. त्याचेच लोकांना अप्रूप आहे.

केशकर्तनालयात जाऊन केलेली कटिंग असो नाही तर रेशन तपासणीसाठी गेल्यानंतर तपासणी झाल्यावर त्याच दुकानदारांच्या कुटुंबातील सदस्याबरोबर खाल्लेली पालकाची भाजी, ठेचा, बेसन आणि भाकरी असो. त्यांची ही स्टाईल सर्वांना भावते आहे. युवकांचा तर त्यांच्याभोवती नेहमीच गराडा असतो. आजही त्याचीच पुनरावृत्ती झाली.

कर्जत तालुक्यातील टाकळी खंडेश्वरी येथे एका सांत्वनपर भेटीसाठी आमदार रोहित पवार आले होते. या वेळी त्यांच्या समवेत काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रा. किरण पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रवीण घुले व ड.कैलास शेवाळे, संतोष म्हेत्रे, बापूसाहेब काळदाते, किशोर तापकीर, डॉ सागर ढोबे आदी उपस्थित होते.

भेट संपून बाहेर पडल्यानंतर आमदार रोहित यांना रस्त्याच्या कडेला एक रिक्षा उभी दिसली. त्यांनी ती कोणाची आहे अशी चौकशी केली. त्या वेळी एक युवक समोर आला. आमदार पवारांनी त्याला विचारले, कुठे चालवता, किती मोबदला मिळतो वगैरे चौकशी केली. मला चालवायची जरा चावी देता का म्हणून विचारणा केली. क्षणभर तो युवक गडबडला.

काय उत्तर द्यावे हे त्याला सुचेना. अखेर त्याने चावी आमदार रोहित यांचेकडे दिली. या वेळी उपस्थित सर्व जण ते काय करतात या कडे मोठ्या कुतूहलाने पाहत होते. रोहित पवार यांनी सेल्फ मारला आणि अगदी सराईत चालकाप्रमाणे बराच वेळ रिक्षा चालविण्याचा आनंद घेतला. हे पाहून उपस्थित अवाक झाले. या वेळी रस्त्याच्या दुतर्फा पुरुषासह महिलांनी मोठी गर्दी केली  होती.

लोकांना भावला रोहित पवारांचा साधेपणा

टाकळी खंडेश्वरी येथील सुरवसे-कोळी वस्ती येथे स्वातंत्र्य मिळाल्यानंतर मतदारसंघाचे एकही आमदार आले  नव्हते. त्यामुळेच तेथे शरद पवारांचे नातू आमदार रोहित पवार येणार म्हणून मोठी उत्सुकता होती. ते प्रत्यक्ष कसे दिसतात, कसे वागतात याबद्दल प्रचंड उत्सुकता होती. मात्र, त्यांचा साधेपणा आणि आपुलकीने केलेली विचारपूस, सहज संवाद कौशल्य सर्वांनाच भावले. ते रिक्षा चालवायला बसले नि रस्त्याकडेला उभ्या असलेल्या आजीबाईंनी बघ बया, पवारसाहेबांचा नातू रिक्षा चालिवतोय, असे आश्चर्यचकीत होत  उदगार काढले. तेंव्हा उपस्थितात एकच हशा पिकला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe FDA Rules : गणेश मंडळांसाठी महत्त्वाची बातमी! आता महाप्रसादासाठी FDA चा परवाना बंधनकारक; तुकाराम मुंढेंचे कडक निर्देश, कसा भरायचा अर्ज?

Rohit Sharma on 2027 WC: निवृत्तीची चर्चा सुरूच होती, त्यात रोहित शर्माने २०२७ च्या वर्ल्ड कपबाबत केलं मोठं विधान; चाहत्यांना टेंशन

'जुळून येती रेशीमगाठी' मालिका ८० च्या दशकात असती तर कसे दिसले असते आदित्य- मेघना? AI ने बनवले कमाल फोटो

Ganesh Chaturthi 2026: गणपती बाप्पाला मोदकाचाच नैवेद्य का? जाणून घ्या मोदकामागचा खरा अध्यात्मिक अर्थ!

Marathi News Live Updates : ...तर गरबा उत्सवात सनातनी मुस्लिमांचे स्वागत करण्यास आपण तयार; अमोल ठाकरे यांची माहिती

SCROLL FOR NEXT