Lot of 25 more corona victims in town! 
अहिल्यानगर

नगरमध्ये कोरोना बाधितांचा आणखी 25 जणांचा लॉट ! 

सकाळ वृत्तसेवा

नगर ः कोरोनाने नगर शहराला चांगलाच विळखा घातला आहे. आज दुपारी प्राप्त झालेल्या अहवालानुसार शहरात आणखी चौदा रुग्ण बाधित आढळले आहे. याशिवाय राहुरी चार, कोपरगाव तीन, पाथर्डी, राहाता, श्रीरामपूर व बीड जिल्ह्यातील प्रत्येकी एकाचा समावेश आहे, अशी दुपारी तब्बल 25 बाधितांची भर पडली आहे. त्यामुळे जिल्ह्यात कोरोनाबाधितांच्या संख्या 500वर पोचली आहे. कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भावाने परिस्थिती आणखी गंभीर होत चालली आहे. नागरिकांनी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन काळजी घेणे गरजेचे आहे. 

जिल्हा रुग्णालयातून दुपारी प्राप्त झालेल्या अहवालानुसार नगर शहरातील तोफखाना दहा, ढवणवस्ती दोन, केडगाव आणि भूषणनगर येथील प्रत्येकी एक बाधित आढळून आला. याशिवाय राहुरी तालुक्‍यातील केसापूर तीन, वांबोरी एक रुग्ण पॉझिटिव्ह आढळला. शिरूरकासार (जि. बीड) येथील एक व्यक्ती बाधित आढळला आहे. वामनभाऊ नगर (पाथर्डी) एक, श्रीकृष्णनगर (कोपरगाव) एक व ओमनगर दोन, शिर्डी (राहाता) एक, खैरे निमगाव (श्रीरामपूर) येथील एक रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आला आहे, असा एकूण 25 जणांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Beed News: अजिंठा डोंगररांगेत निसर्गाचे १४ नवीन झरे शोधले; १९१०च्या ब्रिटिश नकाशातील दोन झरे अजूनही जिवंत

Pune News: गड्या आपला गावच बरा! युद्धानंतर महागाईचा भडका, २० रुपयांचे पोहे ३५ रुपयांवर; विद्यार्थ्यांनी धरली गावची वाट

Petrol Diesel Prices India : मध्य पूर्वेतील तणावाचा तेलांच्या किमतीवर परिणाम ! जाणून घ्या तुमच्या शहरातील पेट्रोल-डिझेलचे आजचे ताजे दर

‘धुरंधर 2’ बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ; पण प्रकाश राज यांचा बॉलिवूडवर सवाल, 'हिंदी कलाकार गप्प का?'

Chhatrapati Sambhajinagar: पुण्यातील मेसवर गॅस टंचाईचा फटका; चुलीवर स्वयंपाक, मेन्यू बदलला.

SCROLL FOR NEXT