Lot of ten corona in the town again ... Sangamner reached 94 
अहिल्यानगर

नगरमध्ये पुन्हा कोरोनाचा दहाचा लॉट...संगमनेर पोचले 94वर 

सकाळ वृत्तसेवा

नगर ः शहरात कोरोनाचा प्रसार काहीसा कमी होत नाही, तोच ग्रामीण भागात कोरोनाने जोर धरला आहे. आज दिवसभरात प्राप्त झालेल्या अहवालांनुसार आणखी दहा जणांचे तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यात संगमनेर तालुक्‍यातील पाच, पारनेर तालुक्‍यातील दोन आणि कर्जत, पाथर्डी व नवनागापूर (नगर) येथील प्रत्येकी एकाचा समावेश आहे. त्यामुळे कोरोनाबाधितांचा आकडा जिल्ह्यात 276वर पोचला आहे. संगमनेर येथील एका व्यक्तीने कोरोनावर मात केल्याने कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या आता 220 झाली आहे. 

कोरोनाने शहरापेक्षा सर्वाधिक वेग ग्रामीण भागात धरला आहे. आजमितीला संगमनेर तालुक्‍यात कोरोनाबाधितांचा आकडा 94वर पोचला आहे. आज सकाळी प्राप्त झालेल्या अहवालात पुण्याहून राशीन (कर्जत) येथे आलेली 60 वर्षांची व्यक्ती, कांदिवली (मुंबई) येथून प्रवास करून भाळवणी (पारनेर) येथे आलेल्या 68 वर्षांच्या व्यक्तीला कोरोनाचा संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले. याशिवाय राजापूर (संगमनेर) येथील 34 वर्षांच्या तरुणाला आजाराची लक्षणे जाणवू लागल्याने उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले असता, त्याचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला. 

आज रात्री प्राप्त झालेल्या अहवालानुसार पुण्याहून निमगाव पागा (संगमनेर) येथे आलेली 38 वर्षांची व्यक्ती, कोल्हेवाडी (संगमनेर) येथील अठरा वर्षांची युवती, कुर्ला-नेहरूनगर (मुंबई) येथून माणिकदौंडी (पाथर्डी) येथे आलेली 33 वर्षांची व्यक्ती, मुंबईहून भोयरे पठार (पारनेर) येथे आलेली 33 वर्षांची व्यक्ती यांना कोरोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले. याशिवाय संगमनेर येथील दोन जणांचे खासगी प्रयोगशाळेचे अहवालही पॉझिटिव्ह आले होते. तसेच नवनागापूर (नगर शहर) येथील व्यक्तीचा अहवाल नाशिक जिल्हा रुग्णालयात पॉझिटिव्ह आला आहे. या तीन रुग्णांमुळे जिल्ह्याच्या एकूण रुग्णसंख्येत पडली आहे. अहमदनगर जिल्ह्यात सध्या कोरोनाचे 45 रुग्ण उपचार घेत असून, 3591 व्यक्तींची तपासणी करण्यात आली. 


कोरोना मीटर 
3591 व्यक्तींची तपासणी 
276 पॉझिटिव्ह 
3217 निगेटिव्ह 
245 निरीक्षणाखाली 
1150 होम क्वारंटाईन 
22 अहवाल येणे बाकी 
220 रुग्णांना डिस्चार्ज 
15 जणांचा मृत्यू 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime : 'कुराश' खेळांच्या बनावट प्रमाणपत्रांचे रॅकेट राज्यभर पसरलेले; एक हजाराहून अधिक बोगस प्रमाणपत्रे वाटली

Bribe Case : कारवाई न करण्यासाठी पाच लाखांची लाच घेताना पोलीस कर्मचारी जाळ्यात

Ganesh Utsav 2026: महाराष्ट्रापासून मिझोरमपर्यंत! कशी साजरी होते गणेश चतुर्थी? जाणून घ्या वेगवेगळ्या राज्यांतील अनोख्या परंपरा!

बायकोचं शीर कापून फ्रीजमध्ये ठेवलं! जेलमधून सुटल्यानंतर पत्नीच्या 'शुगर डॅडी'ला ठार मारण्याची धमकी

Pune News : भाजपमधील धुसफूशीचा मोहोळांच्या उपस्थितीत सोक्षमोक्ष? आज नगरसेवकांची होणार बैठक

SCROLL FOR NEXT