Mahabeej 
अहिल्यानगर

महाबीज कर्जत-जामखेडमध्ये घेणार उडदाचे बीजोत्पादन

वसंत सानप

जामखेड : आमदार रोहित पवार यांच्या पुढाकाराने व महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळातर्फे यंदाच्या खरीप हंगामात जामखेड तालुक्यात २०० व कर्जत तालुक्यात ५० एकरांत उडदाचा बीजोत्पादन कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. येथील शेतकऱ्यांच्या बियाण्यांची गरज तालुक्यातच भागवली जावी, हा उद्देश समर ठेवून हा बीजोत्पादन कार्यक्रम राबविण्यात येणार आहे.

शेतकऱ्यांची बियाण्याची, बीजोत्पादन कार्यक्रमात त्यांचा सहभाग, महामंडळाची संबंधित भागात बियाणे साठवणूक व प्रक्रिया क्षमता व बीजोत्पादनासाठी नैसर्गिक परिस्थिती, आदी बाबींचा विचार करून हा बीजोत्पादन कार्यक्रम राबविण्यात येतो. (Mahabeej will produce urad crop in Karjat-Jamkhed)

बीजोत्पादनासाठी कर्जत तालुक्यातील पाटेगाव, तर जामखेड येथील चौंडी या ठिकाणी हे प्लॉट उपलब्ध करण्यात येणार आहेत. उत्पादित करण्यात येणारी बियाणे हे खरेदी करण्याची हमी महामंडळाने घेतली आहे. मात्र हे बियाणे धान्य म्हणून कोणत्याही व्यापाऱ्याला विकता येणार नाही.

१ नोव्हेंबर ते ३१ डिसेंबर या कालावधीत सरासरी उडीद बाजार भावावर २० टक्के आगाऊ रक्कम शेतकऱ्यांना मिळणार आहे. कर्जत व जामखेडच्या एकूण २५० एकर क्षेत्रातून सरासरी पाच क्विंटल प्रतिएकरप्रमाणे १२५० क्विंटल बियाण्याचे उत्पादन मिळणे अपेक्षित आहे. जामखेड तालुक्याला साधारणत: २००० क्विंटल बियाण्याची आवश्यकता आहे. त्यातील ५० टक्के बियाण्याची गरज आता तालुक्यातूनच भागणार आहे. एकंदरीत दरवर्षी शेतकऱ्यांची बियाण्यांसाठी होणारी ससेहोलपट थांबणार आहे.

शेतकऱ्यांच्या सोयीसाठी

गतवर्षी उडदाच्या बियाण्याची मोठी कमतरता होती. मात्र यापुढे अशी अडचण निर्माण होऊ नये, म्हणून आपणच आपले बियाणे निर्माण करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. या उपक्रमामुळे बियाण्यांची गरज तालुक्यातूनच भागणार असल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळेल.

- आमदार रोहित पवार

बीजोत्पादनाच्या फायद्याचे गणित!

साधारणपणे बाजारात उडदाचा बाजारभाव सहा हजार रुपये प्रतिक्विंटल आहे. त्यामुळे बाजार भावावर २० टक्के आगाऊ रक्कम म्हणजेच १२०० रुपये, महाबीजकडून प्रतिक्विंटल देण्यात येणारा बोनस ५०० रुपये, बियाण्याला मिळणारे शासकीय अनुदान प्रतिक्विंटल ५०० रुपये म्हणजेच महाबीजच्या बाजारभावाची रकम ८२०० रुपयांपर्यंत जाते. गेल्या वर्षीचा बीजोत्पादन दर ८५०० ते ८९०० प्रतिक्विंटल एवढा होता. (Mahabeej will produce urad crop in Karjat-Jamkhed)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sheikh Hasina: हिंसक कारवाईची मोठी किंमत! हत्याकांड प्रकरणी शेख हसीना दोषी; बांगलादेश न्यायालयाकडून मृत्युदंडाची शिक्षा

Latest Marathi Breaking News:विहिरीत पडला बिबट्या, गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण

Ironman Competition: 'पांगरीच्या अजय दडस यांचे आयर्नमॅन स्पर्धेत यश'; गोव्यातील स्पर्धेत ३३ देशांतील सुमारे १३०० खेळाडू सहभागी

Viral Jugaad Video : चाक नसतानाही सुस्साट धावू लागला टेम्पो, जुगाडाचा बादशहा ठरला ड्रायव्हर; व्हिडिओ पाहून डोळ्यांवर विश्वास बसणार नाही

Pushkar Singh Dhami : सीएम धामींनी संरक्षण मंत्र्यांसमोर ठेवल्या सामरिक महत्त्वाच्या मागण्या; नंदा राजजात यात्रेच्या मार्गावरही केली चर्चा

SCROLL FOR NEXT