महंत बालब्रह्मचारी महाराज पंचत्वात sakal
अहिल्यानगर

महंत बालब्रह्मचारी महाराज पंचत्वात

गोदाकाठी संत-महंतांसह हजारो भाविकांच्या उपस्थितीत समाधिस्थ

सकाळ वृत्तसेवा

नेवासे : तालुक्यातील टोका येथील श्री सिद्धेश्वर मंदिराचे प्रमुख महंत १००८ बालब्रह्मचारी महाराज (वय ९९) यांचे शुक्रवारी (ता. १०) रात्री साडेदहाच्या सुमारास देहावसान झाले. त्यांच्या निधनाने देशभरातील भक्तपरिवारात मोठी शोककळा पसरली आहे. शनिवारी (ता. ११) दुपारी संत-महंतांसह हजारो भाविकांच्या उपस्थितीत, साश्रूनयनांनी त्यांना भावपूर्ण निरोप देण्यात आला.दरम्यान, समाधिस्थ होण्यापूर्वी सकाळी ११ वाजता महंत बालब्रह्मचारी महाराज यांना पुष्पांनी सजविलेल्या पालखीत बसविण्यात आले. बाबांचे पुतणे जम्मूचे खासदार जुगलकिशोर शर्मा, आमदार नंदकिशोर शर्मा यांनी पालखीस खांदा दिला.

श्रीक्षेत्र देवगडचे महंत गुरुवर्य भास्करगिरी महाराज, महंत सुनीलगिरी महाराज, महंत ऋषिनाथ महाराज यांच्यासह देशातून आलेले संत-महंत, भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. सिद्धेश्वर मंदिराच्या बाहेरील प्रांगणात समाधी सोहळा पार पडला. आज त्यांच्या इच्छेनुसार गोदावरी-प्रवरा नदीच्या संगमावर बांधण्यात आलेल्या त्यांच्या स्मारकावर वैदिक पद्धतीने वेदमंत्रांच्या जयघोषात अंत्यसंस्कार झाले. मंत्री शंकरराव गडाख यांनी बाबाजींच्या पार्थिवाचे दर्शन घेत शोक व्यक्त केला.

यांनी वाहिली श्रद्धांजली

श्री क्षेत्र देवगडचे गुरुवर्य भास्करगिरी महाराज, गोपालानंदगिरी महाराज, बाबांचे पुतणे जम्मूचे खासदार जुगलकिशोर शर्मा, आमदार नंदकिशोर शर्मा, युवा नेते उदयन गडाख, भाजपचे नेते विठ्ठलराव लंघे, जिल्हा संघटक नितीन दिनकर, माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे, संतोष माने, प्रभाकर शिंदे, अभिमान खंदारे यांनी श्रद्धांजली वाहिली.

बालब्रह्मचारी महाराज हे देशभरातील लाखो भाविकांचे प्रेरणा व ऊर्जास्रोत होते. त्यांच्या जाण्याने आध्यात्मिक क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांना नेवासे तालुका व राज्य शासनाच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.

- शंकरराव गडाख, जलसंधारणमंत्री

महाराजांच्या जाण्याने आध्यात्मिक क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली. आध्यात्मिक क्षेत्रात नव्याने कार्य करणाऱ्या संत-महंत यांना महाराज आदर्श उदाहरण होते. संपूर्ण भारतभर महाराजांवर श्रद्धा असलेला भक्तवर्ग मोठा आहे. त्या भक्तांना हे दुःख सोसण्याचे सामर्थ्य भगवंतांनी द्यावे.

- गुरुवर्य किसनगिरी महाराज, प्रमुख, श्री क्षेत्र देवगड संस्थान

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MS Dhoni: कॅप्टनकूलने ४४ वा वाढदिवस कुटुंबासोबत केला साजरा, आई-बाबाही होते उपस्थित; Video आला समोर

Latest Maharashtra News Updates : कोथरुड येथे खिडकीतून पडणाऱ्या मुलीला जवानाने वाचवले

Viral Video: ६ चेंडू, ६ विकेट्स! ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये अविश्वसनीय विक्रम, इंग्लंडमध्ये घडला २४ तासांत अजब पराक्रम...

Maharashtra Assembly Session: 'ओम फट स्वाहा...' विधिमंडळाच्या पायऱ्यांवर विरोधकांची टोलेबाजी; नितेश राणेंना म्हणाले...

बायकोसाठी कायपण ! नंदिनीला मनवण्यासाठी रिक्षावाला झाला जीवा; तर पार्थसाठी काव्या...; नवा प्रोमो पाहून नेटकरी खुश

SCROLL FOR NEXT