अहिल्यानगर

महाराष्ट्र केसरी ते ऑलिम्पिकच्या पदकापर्यंत मजल! पठार भागाचे कुस्ती वैभव आंबीदुमालाचे बबन पैलवान

पठार भागाचे कुस्ती वैभव आंबीदुमालाचे बबन पैलवान यांनी भारताला कुस्ती स्पर्धेत वैयक्तिक ऑलिम्पिक पदकाचा बहुमान मिळवून दिला.

शांताराम जाधव

Maharashtra Kesari to Olympic Medal: पठार भागाचे कुस्ती वैभव आंबीदुमालाचे बबन पैलवान यांनी भारताला कुस्ती स्पर्धेत वैयक्तिक ऑलिम्पिक पदकाचा बहुमान मिळवून दिला. १९५०-६० च्या दशकात मुंबईत झालेल्या कुस्तीच्या आखाड्यात पाकिस्तानचे आजम व अक्रम या कुस्तीपटूनांही बबन यांनी चितपट केले होते.

एकेकाळी कुस्ती खेळाच्या माध्यमातून भारताच्या वतीने जकार्ता येथेही स्पर्धेसाठी गेले होते. अशा या बबन पैलवान यांची महाराष्ट्र केसरीपर्यंत मजल गेली होती. स्वर्गीय खाशाबा जाधव यांचा आज (१५ जानेवारी) जन्मदिन. यानिमित्त बबन पैलवान यांच्या आठवणींना दिलेला उजाळा.

१५ जानेवारी आता महाराष्ट्र राज्य क्रीडा दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय शासनातर्फे नुकताच जाहीर करण्यात आला आहे. गावांकडचा कुस्ती खेळ हा शारीरिक क्षमता, कसोटींचा व डावपेचांनी युक्त असा मानला जातो. या कुस्ती खेळातूनच आपल्या नावावरून गावाची ओळख निर्माण करणारे संगमनेर तालुक्यातील आंबीदुमाला गावाचे बबन पैलवान. भाऊ नामदेव नरवडे यांना गावकरी ‘बबन’ या आवडत्या नावाने ओळखायचे.

जेमतेम शिक्षण व मुंबईलाच बालपण गेले. बबन यांना लहानपणापासूनच कुस्तीची आवड निर्माण झाली. मुंबईतील माझगाव परिसरातील देवराम हासे या वस्तादांकडून त्यांनी कुस्तीचे डावपेच व धडे गिरवले. गावाकडील संपर्कातून त्यांनी गावातच दहा पैलवान तयार केले. कुस्ती त्यांचा श्वास बनला. बबन पैलवान यांनी मुंबईसह, नगर, पुणे, नाशिक, सोलापूर या जिल्ह्यातील जवळपास दोनशे कुस्तींचे मैदाने गाजवले.

१९५७ काळात कृषिमंत्री शरद पवार यांच्या हस्ते आखाड्यात कुस्ती लावण्याचा योग आला. त्या मैदानावरही बबन पहिलवान यांनीच बाजी मारली. १९५०-६० च्या दशकात मुंबईत झालेल्या कुस्तीच्या आखाड्यात पाकिस्तानचे आजम व अक्रम या कुस्तीपटूनांही बबन यांनी चितपट केले होते. एकेकाळी कुस्ती खेळाच्या माध्यमातून भारताच्या वतीने जकार्ता येथेही स्पर्धेसाठी गेले होते.

अशा या बबन पैलवान यांची महाराष्ट्र केसरीपर्यंत मजल गेली होती. कुस्ती विजेता या बहुमानबाबत त्यांना मुंबईतून छत्रपती शिवरायांचा अर्ध पुतळा देण्यात आला होता. तोच पुतळा आज आंबीदुमाला गावाच्या चौकात दिमाखाने उभा आहे. बबन पैलवान यांचे १८ फेब्रुवारी २०२१ दरम्यान निधन झाले. भारतीय कुस्तीपटू खाशाबा जाधव यांच्या जन्म दिनानिमित्त बबन पैलवान यांच्या आठवणींना गावकऱ्यांनी उजाळा दिला.

बक्षिसांतून शैक्षणिक इमारतीसाठी मदत

यात्रा, उत्सवातील आखाड्यातील भाऊ नामदेव नरवडे उर्फ बबन पैलवान यांची शेवटची व मानाची कुस्ती ठरलेली असायची. डोळ्याची पापणी लावण्याच्या आतच प्रतिस्पर्धी चितपट व्हायचा. त्यांचे डावपेच भल्याभल्यांना ओळखू येत नसायचे. तर दुसरीकडे याच कुस्तीच्या आखाड्यात जिंकलेल्या रकमेचं त्यांनी संगमनेर तालुका व नारायणगाव (जि.पुणे) या ठिकाणी शैक्षणिक इमारतीच्या बांधकामासाठी मदतही केली आहे. (Latest Marathi News)

आजोबांच्या पाठोपाठ वयाच्या १४ व्या वर्षापासून ते २६ व्या वर्षापर्यंत कुस्तीच्या आखाड्याचा पारंपारिक वारसा बबन पैलवान यांनी चालविला. कर्नाटक राज्यातही कुस्तीच्या संदर्भात आजोबांच्या ओळखीचा अनुभव आला. पूर्वी कुस्तीच्या माध्यमातून मिळवलेली ताकद समाज उपयोगासाठी वापरली जायची. आजच्या काळात पालकांची मुलांविषयी अनाठायी भीती वाढली आहे. तरुणांनी बौद्धिक बरोबरच शारीरिक तंदुरुस्तीत सुद्धा आघाडीवर राहायला हवेत.-दिनेश नरवडे, नातू.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुख्यमंत्र्यांच्या डेडलाइनला पावसाचा फटका! मुंबई-पुणे प्रवासाचा ‘एक्सप्रेस’ स्वप्नाला धक्का; मिसिंग लिंक उशिरा पूर्ण होणार

Rahul Gandhi Reaction : डॉ. संपदा मुंडे आत्महत्या प्रकरणावर राहुल गांधींनी व्यक्त केला संताप ; भाजप सरकावर मोठा आरोप, म्हणाले...

Government Job: महाराष्ट्रात ९३८ सरकारी पदांसाठी भरती; २७ ऑक्टोबरपर्यंतच अर्ज करता येणार, जाणून घ्या प्रक्रिया...

MLA Anna Bansode : माजी आमदार राजन पाटील व यशवंत माने यांना राष्ट्रवादीने भरभरून दिले, त्यांना पूर्ण विचार करण्याचा अधिकार

AIIMS Recruitment 2025: एम्समध्ये प्राध्यापक पदांसाठी भरती सुरू; जाणून घ्या अर्जाची शेवटची तारीख आणि निवड प्रक्रिया

SCROLL FOR NEXT