mal rohit pawar inspected the agriculture in Jamkhed damaged due to heavy rains
mal rohit pawar inspected the agriculture in Jamkhed damaged due to heavy rains Sakal
अहमदनगर

भर पावसात रोहित पवार अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर

सकाळ डिजिटल टीम

जामखेड (जि. नगर) : जामखेड तालुक्यात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतीची पाहणी करण्यासाठी आमदार रोहित पवार भर पावसात शेताच्या बांधावर पोचले आणि त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. एका ठिकाणी चिखलाने माखलेला रस्ता पाहून, अपेक्षित ठिकाणी पोचणे अवघड असल्याचे लक्षात आल्याने त्यांनी स्वतः ट्रॅक्टर चालविणे पसंत केले अन् कार्यकर्त्यांसह संबंधित ठिकाणी पोचले.



मांजरेच्या तीरावरील दिघोळ, जातेगाव या गावांपाठोपाठ तेलंगशी, धामणगाव, मोहरी, सातेफळ, वंजारवाडी, तरडगाव, धनेगाव या गावांना अतिवृष्टीचा फटका बसला. यांपैकी मांजरेच्या काठावरील गावांना पवार यांनी भेट देऊन नुकसानीची पाहणी केली. त्यानंतर नायगाव येथील नुकसानग्रस्त शेताची पाहणी करण्यासाठी ते नायगावात दाखल झाले. मात्र, चिखलमय रस्त्यावरून प्रवास करणे अशक्य असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी कार्यकर्त्यांना घेऊन थेट ट्रॅक्टरवर बसून, नुकसान झालेल्या शेताच्या बांधावर जाऊन संवाद साधला. ओव्हर फ्लो झालेल्या नायगाव तलावात जलपूजन केले.

तालुक्‍यातील काही गावांना मागील तीन दिवसांपासून अतिवृष्टीचा तडाखा बसल्याची माहिती मिळाल्यानंतर पवारांनी दौरा केला. त्यांनी बांधखडक येथून जामखेड व भर पावसात कुसडगाव गाठले अन् पावसात उसाच्या शेताची पाहणी केली. नुकसानीचे पंचनामे करण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी महसूल कर्मचाऱ्यांना दिले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का! 40 वर्ष ठाकरेंसाठी काम करणाऱ्या नेत्याचा शिंदेसेनेत प्रवेश

PCB T20 WC 24 : वर्ल्डकप सुरू होण्याआधीच हरायची तयारी! गॅरी कर्स्टन बळीचा बकरा... पाकिस्तानचा माजी खेळाडू हे काय म्हणाला?

Crime: माजी मंत्र्याच्या क्रूर मारहाणीत पत्नीचा मृत्यू; घटना सीसीटीव्हीमध्ये कैद, लोकांमध्ये संताप

कोल्हापूर लोकसभेची निवडणूक ऐतिहासिक आणि कागल तालुक्याला आव्हान देणारी आहे; असं का म्हणाले मुश्रीफ?

Sucharita Mohanti: काँग्रेसची दुर्दशा सुरूच! आणखी एका उमेदवारानं परत केलं लोकसभेचं तिकीट; कारण ऐकून म्हणाल...

SCROLL FOR NEXT