Marriage at seven in the morning 
अहिल्यानगर

सकाळी सातला विवाह अन्‌ नऊला नवरी सासरी 

सकाळ वृत्तसेवा

श्रीगोंदे : बॅंडबाजा तर लांबच, मामा यायचीसुद्धा वाट पाहिली नाही. सकाळी सात वाजता भटजींनी शुभमंगल सुरू केले आणि दोन तासांत तर नवरी नवरदेवासोबत सासरी. नात्यातच झालेल्या या विवाहाला केवळ आठ ते नऊ जण उपस्थित आणि सगळ्यांनाच घाई होती, लवकर उरका आणि निघा म्हणण्याची... 

कोरोनाला अजिबात न घाबरता मोकाट फिरणाऱ्यांची संख्या चांगलीच असली, तरी कोरोनासोबतच प्रशासनाच्या भीतीने अनेकांनी घरात बसणे पसंत केले आहे. सध्या लग्नसराईदेखील सुरू असून, ठरलेल्या विवाहांचे काय करायचे, असा मोठा प्रश्न वधू व वराच्या घरच्यांना पडला आहे. मात्र, काही लोकांनी यात मध्यममार्ग काढत शेजारच्यांनाही नवी नवरी घरी आल्यावरच "दोनाचे चार हात झाले' हे समजते. 
रुसवा-फुगवा आणि मान-पान दूरच; आता होणारे लग्न किती घाईत सुरू आहे, याचे उदाहरण आज तालुक्‍यात पाहायला मिळाले. नगर-दौंड महामार्गालगत असणाऱ्या एका बागायती गावात भल्या सकाळी विवाह पार पडला. 25 किलोमीटर अंतरावरून नवरदेवाचे आगमन पहाटेच झाले. कोण आले, कोण राहिले याची अजिबात चर्चा न करता हळदीचा कार्यक्रम उरकला. सकाळी सात वाजता भटजींनी पहिले मंगलाष्टक म्हणायला सुरवात केली आणि नवरीचा मामा धावतच आला. "मी येईपर्यंत तरी थांबायचे होते' असा नाराजीचा सूर लावण्यापूर्वीच दोन्हीकडच्या मंडळींनी "नवरीच्या पाठीशी उभा राहा' असा इशारा केला. शुभमंगल सावधान झाले... 

नवरदेवाच्या गावात शेजाऱ्यांचीही "आज विवाह आहे' ही चर्चा सुरू होण्यापूर्वीच नवरीला घेऊन मोटार घरापुढे थांबली. आता अशीच लग्ने व्हावीत, असे आशीर्वाद देत ज्येष्ठ मंडळींनी "चहा तरी पाजा' असा हट्ट मात्र धरला. 
 

 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tata Chairman Salary: Tata Sons च्या चेअरमनला किती पगार मिळतो? नोएल टाटांच्या विरोधानंतर पद पुन्हा चर्चेत; आकडा पाहून धक्का बसेल!

Akola News : जिल्हाधिकाऱ्यांनी सोडले शेतकऱ्यांना वाऱ्यावर; महाबीज प्रशासनाकडून माहिती देण्यास नकार, एमडींनीही केले हात वर

Ai+ Nova 2 Power 5G भारतात लाँच! 16,999 रुपयांत खरेदीची संधी...पाहा फीचर्स अन् ऑफर्स!

Katraj Kondhwa Road Issue : आयुक्तांचे आश्वासन विरणार हवेत! कात्रज कोंढवा रस्ता; उर्वरित १० मिळकतींमुळे रस्ता रुंदीकरण रखडणार

Farmer Agitation : शेतकरी संकटात, सरकार कुठंय? लोहाऱ्यात हजारो शेतकऱ्यांचा आक्रोश; आमदारांना बोलण्यास मनाई करत शेतकऱ्यांनी सोयाबीन उधळले

SCROLL FOR NEXT