Marriage for two rupees by an officer who has passed the examination of the Central Public Service Commission 
अहिल्यानगर

उच्च अधिकारीपदावर कार्यरत असणाऱ्या तरुण- तरुणीने केले अवघ्या दोन रुपयांत लग्न

सकाळ वृत्तसेवा

अहमदनगर : लग्न म्हटले, की डामडौल, हुंडा, बॅंडबाजा नि वऱ्हाडी मंडळींची गर्दी. त्यांची सरबराई करण्यात गुंतलेले वधू-वर पिता. रुसवे-फुगवे नि पैशांचा महापूर.. दिखाऊपणाच्या या फॅडमुळे, खोट्या प्रतिष्ठेपायी सर्वसामान्य कुटुंबांवर कर्जाचे डोंगर उभे राहिले. त्यातून सावरता- सावरता अनेकांची आयुष्ये सरली. असा हा फुकाचा मोठेपणा टाळून उच्च अधिकारीपदावर कार्यरत असणारे तरुण-तरुणी अवघ्या दोन रुपयांत विवाहबंधनातून एक झाले. 

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेतून भारतीय वनसेवेत (आयएफएस) अधिकारी असणारे चिखली (ता. श्रीगोंदे) येथील चंद्रशेखर शंकरसिंग परदेशी व चलबुर्गा (ता. औसा, जि. लातूर) येथील राज्य करनिरीक्षक शुभाली लक्ष्मीकांत परिहार, अशी या दाम्पत्याची नावे. आयएफएस चंद्रशेखर परदेशी एकत्र कुटुंबातच वाढले. त्यांचे वडील शंकरसिंग परदेशी प्रगतिशील शेतकरी. एसटीआय शुभाली या लक्ष्मीकांत परिहार यांच्या कन्या. विशेष म्हणजे, त्यांच्या गावातील त्या पहिल्या महिला अधिकारी आहेत. 

नगर जिल्ह्यातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
साध्या पद्धतीने, कमी खर्चात लग्ने व्हावीत, यासाठी परदेशी व परिहार कुटुंबांसह या उच्च अधिकारीपदावरील जोडप्याने रजिस्टर पद्धतीने विवाह करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार अवघ्या दोन रुपयांत ते आज विवाहबद्ध झाले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या सोहळ्यासाठी दोन्ही कुटुंबांतील मोजक्‍याच व्यक्ती उपस्थित होत्या. 

जेवढे मोठे लग्न, तेवढी मोठी प्रतिष्ठा, असा एक गैरसमज लोकांमध्ये आहे. त्यामुळे बरेच लोक लग्नात अमाप खर्च करतात. खोट्या प्रतिष्ठेपायी गरीब व मध्यमवर्गीय कुटुंबांवर त्यातून कर्जाचा डोंगर उभा राहतो. त्याचा परिणाम परिवारातील अन्य मुला-मुलींच्या शिक्षणावर होतो. लग्नातील अवाजवी खर्च टाळून तो मुलींच्या शिक्षणावर केला, तर त्या स्वतःच्या पायावर उभ्या राहतील, असा संदेश या जोडप्याने समाजाला दिला. तसेच, ज्यांची आर्थिक परिस्थिती चांगली आहे, त्यांनीही अशाच पद्धतीने विवाह केल्यास त्यातून वाचलेला पैसा सामाजिक कार्यात खर्च करता येईल. भविष्यात नोकरी करतानाच मुलींच्या शिक्षणासाठी मोठे काम उभे करण्याचा नवदाम्पत्याचा मानस आहे. 

आयएफएस अधिकारी चंद्रशेखर परदेशी म्हणाले, लहानपणापासून अनेक शेतकऱ्यांना मुलींच्या लग्नासाठी शेतजमीन, बैलजोडी विकताना पाहिले आहे. त्यामुळे कमी खर्चात लग्न करून जनजागृती करण्याची इच्छा होती. या कार्यात दोन्ही कुटुंबीयांनी दिलेल्या पाठिंब्यामुळेच हे शक्‍य झाले.

राज्य करनिरीक्षक शुभाली परिहार-परदेशी म्हणाल्या, आई-वडिलांच्या पाठिंब्यामुळे अनेक अडचणींवर मात करून मी स्वतःच्या पायावर उभी राहू शकले. त्याचप्रमाणे, प्रत्येक पालकाने आपल्या मुलीच्या शिक्षणासाठी प्रोत्साहन द्यावे. 

संपादन : अशोक मुरुमकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

आयोगाच्या बाजूने उत्तर देत नाही म्हणत भाजपनेही मतदारयादीतला घोळ पुराव्यासह दाखवला, 'सत्याचा मोर्चा'तलाच व्हिडीओ लावला

Women's World Cup : भारतीय महिला संघाचे गाणं ऐकलंत का? चार वर्षांपूर्वी ठरवलं होतं, जेव्हा वर्ल्ड कप जिंकू तेव्हा... Video Viral

Latest Marathi News Live Update : महिला विश्वचषक विजयानंतर सांगलीत जल्लोष

Anil Ambani Assets Seized : ईडीची अनिल अंबानींविरोधात सर्वात मोठी कारवाई; मुंबई, पुण्यासह देशभरातील हजारो कोटींची संपत्ती जप्त

७० पेक्षा जास्त क्रिकेटर अडकले हॉटेलमध्ये, फायनलआधी आयोजकच फरार; गेल, गुप्टिलसह अनेक दिग्गजांचा स्पर्धेत सहभाग

SCROLL FOR NEXT