A medical college professor has been attacked in Ahmednagar 
अहिल्यानगर

वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्राध्यापकावर प्राणघातक हल्ला

सकाळ वृत्तसेवा

अहमदनगर : वैद्यकीय महाविद्यालयातील प्राध्यापकावर पदोन्नतीच्या कारणातून सहायोगी प्राध्यापिकेच्या पतीने प्राणघातक हल्ला केला. यशवंत दंत महाविद्यालय (वडगाव गुप्ता, ता.नगर) येथे शनिवारी (दि.20) ही घटना घडली. या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात प्राणघातक हल्ला केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अहमदनगरच्या बातम्यांसाठी येथे क्लिक करा 
 
डॉ. दिनेश विजय राजपूत (वय 44, मूळ रा. औरंगाबाद, हल्ली रा. कर्मचारी वसाहत, वडगाव गुप्ता) हे यशवंत दंत महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. याच महाविद्यालयातील प्राध्यापिकेचे पती अतुल प्रविण पाटीदार (वय 48, रा. शिरसाठ मळा, सावेडी) यांनी पदोन्नतीच्या वादातून महाविद्यालयाच्या वाहनतळावर आले. डॉ. राजपूत हे महिंद्रा एक्‍सयुव्ही (एमएच 20 ईजे 1507) वाहनातून जात होते. त्यावेळेस अतुल पाटीदार यांनी बेसबॉल बॅटने वाहनाची पुढील काच फोडली.

बॅटने डोके आणि गुडघ्यावर वार केले. डॉ. राजपूत या हल्ल्यात गंभीर जखमी झाले आहेत. त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलिस ठाण्यात आरोपी पाटीदार याच्याविरुद्ध प्राणघातक हल्ला करणे (भादंवि 307) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक आठरे पुढील तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Crisis: देशहितासाठी त्याग! ६ महिने सिलेंडरला पूर्ण ‘नकार’; महाराष्ट्रातील गावांचा मोठा निर्णय, LPG वापर बंद राहणार

Ambarnath इंधन तुटवड्याच्या अफवेमुळं टाकी फुल्ल केली, दुचाकी पेटली; घटनेचा VIDEO VIRAL

जिद्द आणि कष्टाला वर्दीचा सलाम! नारोडीची लेक ऋतुजा हुले महाराष्ट्र पोलीस दलात; ग्रामीण भागातील तरुणीची स्वप्नपूर्ती

3000 रिक्षांची चाके थांबली! गॅस तुटवड्यामुळे पंपाबाहेर रिक्षांच्या रांगा; ‘एलपीजी’चे दर 32 रुपयांनी वाढले, ‘या’ शहरात रिक्षा प्रवास 10 रुपयांनी महागला

पुणेकरांनो, इंधन तुटवडा नाही, गर्दी करू नका! पेट्रोल डीलर्स असोसिएशनचं आवाहन; राज्य सरकारनेही खरेदीबाबत दिले मोठे अपडेट

SCROLL FOR NEXT