Meeting of traders and police in Rashin 
अहिल्यानगर

खंडणी व हप्ता मागणाऱ्यांची, दादागिरी करणाऱ्यांची गय करणार नाही

दत्ता उकीरडे

राशीन (अहमदनगर) : व्यापाऱ्यांना कोणी खंडणी, हफ्ता मागत असेल, दादागिरी करीत असेल तर त्याची गय केली जाणार नाही. व्यापाऱ्यांनी असा प्रकार कोणतेही दडपण न ठेवता पोलिसांना सांगावा, असे आवाहन पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी केले. 

सोमवारी (ता. 21) रात्री सिध्दटेक रस्त्यावरील सावतामाळी किराणा ॲण्ड बेकर्स दुकानातून तीन लाखांची चोरी झाल्यानंतर यादव यांनी व्यापाऱ्याची तातडीने बैठक बोलावली होती. यावेळी सरपंच निलम साळवे, उपसरपंच शंकर देशमुख, राम कानगुडे, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष आजीनाथ मोढळे, प्रसाद मैड, ग्रामविकास अधिकारी कैलास तरटे, सहायक पोलिस निरीक्षक सोमनाथ दिवटे आदी उपस्थित होते. 

नगर जिल्ह्यातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
यावेळी वाहतूक कोंडी, भाजीमंडई, दारूबंदी, मोकाट जनावरे, डबल ट्रॉलीची ऊस वाहतूक, त्यावरील कर्णकर्कश गाणी, दुचाकींना लावलेल्या एलईडी लाईट आदी समस्या माजी जिल्हा परिषद सदस्य दादासाहेब कानगुडे, एन.एस.पाटील, सतीश मैड, गणेश कदम, मालोजी भिताडे, विनोद राऊत,अतुल साळवे यांनी मोठया पोटतिडकीने पोलिस निरीक्षक यादव यांच्यासमोर मांडल्या, त्यावर सर्वांच्या सहकार्यातून ठोस उपाययोजना करण्याचे आश्‍वासन यादव यांनी दिले. 

यादव म्हणाले, व्यापारी आणि सराफा दुकानदारांनी आपल्या दुकानांसमोर सीसीटीव्ही कॅमेरे बसवून खासगी सुरक्षा रक्षकांची नेमणूक करावी. राशीन पोलिस दूरक्षेत्राअंतर्गत येणाऱ्या 36 गावांसाठी स्वतंत्र तीन बिट अंमलदारांची नेमणूक करण्यात येईल. 

पोलिसांकडे यायला अवैध व्यावसायिकांची मदत नको....
उपसरपंच शंकर देशमुख म्हणाले, पोलिस स्टेशनला येण्यासाठी सर्वसामान्य माणसाला अवैध व्यावसायिकची मदत घेऊन यावे लागत होते ही परिस्थिती बदलली पाहिजे.त्यावर यादव यांनी अशी वेळ कोणावरही येणार नाही असे स्पष्ट केले. 

संपादन : अशोक मुरुमकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

72-Year-Old Paragliding : आजोबांनी Gen-Z लाही लाजवलं ! वयाच्या ७२व्या वर्षी घेतली आकाशात झेप, २४ हजार फूट उंचीवरून पॅराग्लायडिंग, VIDEO VIRAL

IND vs AFG 3rd T2OI: वैभव सूर्यवंशीला संधी नाहीच... श्रेयस अय्यरने Playing XI मध्ये केलाय एक बदल; जाणून घ्या संघ

Crime News: धक्कादायक! चार वर्षीय चिमुकलीसोबत ८५ वर्षीय वृद्धाचे अश्लील कृत्य, डोंबिवलीत संतापाची लाट

Latest Marathi News Update : पहलगाम दहशतवादी हल्ला प्रकरणी आरोपी सैफुल्ला उर्फ ​​साजिद जट्ट याच्या विरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी

Kasari Power Protest: गणेशोत्सवात अखंडित विजेसाठी कासारी ग्रामस्थांचे महावितरणला साकडे; पोतराज आंदोलनाचा इशारा

SCROLL FOR NEXT