A meeting will be held at the Ministry for the grant of the Education Board  
अहिल्यानगर

शिक्षण मंडळाच्या अनुदानासाठी बैठक मंत्रालयात बैठक घेणार 

गौरव साळुंके

श्रीरामपूर (अहमदनगर) : नगरपालिका शिक्षण मंडळाच्या थकीत अनुदानासाठी मंत्रालयात नगरविकास खात्याच्या अधिकाऱ्यांची बैठक घेणार आहे, अशी ग्वाही आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी दिली. 

शिक्षण मंडळाचे थकीत अनुदान, बीएलओ नियुक्ती, शिक्षण उपसंचालकाकडून वेतनास होणारा विलंब, एमएस सीआयटी मुदतवाढ असे विविध प्रश्न सोडविण्यासाठी शिक्षक बॅंकेचे संचालक सलीमखान पठाण यांनी नगरपालिका शिक्षक संघ, गुरुमाऊली महिला आघाडी आणि तालुका शिक्षक समन्वय समितीच्या पदाधिकाऱ्यांची आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्या समवेत येथील शासकीय विश्रामगृहात बैठक आयोजित केली होती. 

नगर जिल्ह्यातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
आमदार डॉ. तांबे म्हणाले की, संगमनेर नगरपालिकेत आपण नगराध्यक्ष म्हणून काम केले. त्यामुळे शिक्षण मंडळाच्या प्रश्नांची आपल्याला जाणीव असून हा प्रश्न तातडीने सोडवणार आहे. बीएलओच्या कामाबाबत शिक्षकांना आज पर्यंत सक्ती केली. परंतु, यामध्ये सर्व केडरचे लोक सहभागी करून घेण्याबाबत आपण विभागीय आयुक्तांशी चर्चा करणार असल्याचे त्यांनी सांगितले. 

शिक्षकांनी बीएलओच्या कामाला उच्च न्यायालयाकडून मनाई आदेश घेतला आहे. तरीही अधिकाऱ्यांकडून शिक्षकांवर कामाबाबत दबाव आणला जात असल्याची तक्रार बैठकीत करण्यात आली. यासंदर्भात आपण जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करणार असल्याते ते म्हणाले. सेवानिवृत्ती वेतनास दरमहा होणारा विलंब दूर करण्याची मागणी नगरपालिका पेन्शनर्स संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रताप देवरे, शहराध्यक्ष प्रकाश माने यांनी केली. येथील शिक्षकांतर्फे आमदार डॉ. तांबे यांचा सत्कार करण्यात आला. शकील बागवान यांनी आभार मानले. 

संपादन : अशोक मुरुमकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Investment in US Stock Market : अ‍ॅपल–अ‍ॅमेझॉनचे शेअर्स घ्यायचेत? भारतीयांनी अमेरिकन शेअर बाजारात अशी करावी गुंतवणूक

Crime: दुर्दैवी! हॉटेलमध्ये गेला, दरवाजा बंद केला अन्... लोकप्रिय विनोदी कलाकाराच्या मुलाने जीवन संपवलं; नेमकं काय घडलं?

'मिसेस देशपांडे' वेब सीरिजमध्ये सिद्धार्थ चांदेकरसोबत बोल्ड सीन देणारी अभिनेत्री आहे तरी कोण? चाहत्यांनाही उत्सुकता

Aravalli Hills : 29 जिल्ह्यांची लाइफलाइन, 20 अभयारण्य अन् 5 कोटी लोक जगवणारी...जर अरवली पर्वतरांग नसती तर काय झालंं असतं?

Junnar Leopard : जुन्नर वनविभागात बिबट्यांना पकडण्यासाठी ४०० पिंजरे तैनात; तरीही जुन्नरमध्ये बिबट संकट कायम!

SCROLL FOR NEXT