The memorial of Martyr Jawan Valte is inspiring 
अहिल्यानगर

दहेगाव बोलकातील वलटे यांचे स्मारक प्रेरणादायी ः आशुतोष काळे

मनोज जोशी

कोपरगाव : तालुक्याचे सुपुत्र वीर जवान नायब सुभेदार सुनील वलटे देशाच्या सीमेवर कर्तव्य बजावत असतांना हुतात्मा झाले. त्यांनी देशासाठी दिलेल्या बलिदानातून व त्यांनी दाखविलेल्या शौर्याची तरूण पिढीला प्रेरणा मिळावी यासाठी दहेगाव बोलका ग्रामस्थांनी त्यांचे स्मारक उभारले हे खरोखर अभिमानास्पद आहे.

शहीद वीर जवान नायब सुभेदार सुनील वलटे यांच्या बलिदानामुळे तालुक्याने शूर भूमिपुत्र गमावला असून त्यांचे बलिदान देश कधीही विसरणार नाही असे प्रतिपादन आमदार आशुतोष काळे यांनी केले.

सराला बेटाचे मठाधीपती महंत ह.भ.प रामगिरी महाराज यांच्या हस्ते समस्त ग्रामस्थ दहेगाव बोलका,स्मारक समिती व शहीद परिवार यांच्या माध्यमातून उभारण्यात आलेल्या शहीद स्मारकाचे अनावरण आज करण्यात आले.

आमदार आशुतोष काळे यांनी श्रद्धांजली वाहून पुष्पचक्र अर्पण केले त्याप्रसंगी ते बोलत होते. य शिरसगाव (श्रीरामपूर)ग्रामपंचायतीच्या वतीने शहीद जवान वलटे यांच्या कुटूंबियांना 50,000 रुपयांचा धनादेश आमदार आशुतोष काळे यांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आला.

यावेळी तहसीलदार योगेश चंद्रे, कोपरगाव ग्रामीण पोलीस निरीक्षक अनिल कटके, काळे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष सुधाकर रोहोम, कोपरगाव जिनिंग व प्रेसिंग सोसायटीचे चेअरमन गोरक्षनाथ जामदार, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष चारुदत्त सिनगर, वीरपिता रावसाहेब वलटे, वीरमाता सुशीला वलटे, वीरपत्नी मंगल वलटे, भाऊ अनिल वलटे, मुलगा वेदांत वलटे, जगन बागल, अनिल वलटे, अशोक भोकरे, भास्कर वलटे, रावसाहेब आभाळे, गुलाबराव देशमुख, आबा रक्ताटे व ग्रामस्थ उपस्थित होते.

संपादन - अशोक निंबाळकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

बेस्ट अपघातातील मृतांची ओळख पटली, २५ ते ५० वर्षीय तीन महिलांचा समावेश; ९ जणांवर उपचार सुरू

King Cobra Kolhapur अबब! कोल्हापुरात आढळला तब्बल १० फुटांचा 'किंग कोब्रा', चिकन कंपनीजवळ दिसला अन्...

माझा मुलगा आणि ती... हेमलता बाणे खंडणी प्रकरणात अर्चना पाटकरांचा मोठा खुलासा; म्हणाल्या, 'माझ्या कुटुंबाचा तिच्याशी...

Priyanka Gandhi: कोण आहे प्रियांका गांधींची होणारी सून? ७ वर्षांचं नातं, आता साखरपुडा! ६५ कोटींची होणार मालकीण

Sindhudurg : धरण असूनही तहानलेले शहर! सावंतवाडीचा पाणीप्रश्न सुटणार तरी कधी?

SCROLL FOR NEXT