Military inspection of this village in Parner again
Military inspection of this village in Parner again 
अहमदनगर

पारनेरमधील या गावांत पुन्हा मिलिटरीकडून पाहणी, धास्तावलेल्या गावकऱ्यांना लंके म्हणाले...

सनी सोनावळे

टाकळी ढोकेश्वर ः  पारनेर तालुक्यातील वडगाव सावताळ, पळशी, गाजदीपूरमध्ये आज (ता.०९)रोजी सैन्य दलाच्या वाहनातून अधिका-यांनी गावाची पाहणी केली याबाबत कोणालाही माहिती न देता या गावांना त्यांनी भेटी दिल्याने गावातील नागरिकांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे.

यामुळे के.के.रेंज जमीन अधिग्रहण चर्चेचा विषय पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. ही माहिती आमदार नीलेश लंके यांना मिळाल्यानंतर याबाबत उद्या(ता.१०) पारनेर येथे ग्रामस्थासमवेत बैठक घेणार असल्याचे वनकुटेचे सरपंच राहुल झावरे यांनी सांगितले.

या बाबत माहिती अशी की, आज (ता.०९) वडगाव सावताळ,पळशी,गाजदीपूर या गावांमध्ये सैन्य दलाच्या वाहनातून लष्कराचे अधिकारी गावामध्ये कोणतीही पूर्वसुचना न देता गावाची पाहणी करीत आहेत. या बाबत नागरिकांनी त्यांना विचारल्यानंतर त्यांच्याकडुन कुठलेही उत्तर न मिळाल्याने ग्रामस्थामध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

के.के.रेंजबाबत अनेक आंदोलने, वरिष्ठ नेत्यांना निवदेने नेहमी सुरू असतात. विषय मागे पडलाय असे नागरिकांना वाटते. मात्र, त्याउलट चित्र आज पहावयास मिळाले. सैन्य दलाच्या गाड्या गावात येतात. अधिकारी पाहणी करताना दिसतात. त्यांना काही विचारल्यानंतर काहीच उत्तर मिळत नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये असंतोष निर्माण होत आहे.


काय आहे के.के.रेंज चा विषय 

के.के.रेंज आर - २ सुरक्षा क्षेत्रामध्ये पारनेर तालुक्यातील ५ राहुरी १२ गावांचा तर नगर तालुक्यातील ६  गावांचा सहभाग आहे. पारनेर तालुक्यातील वनकुटे,पळशी, वडगाव सावताळ, गाजदीपूर, ढवळपूरी गावांचा समावेश आहे. जमीन अधिग्रहण होणार की नाही याबाबत ठोस प्रत्युत्तर नागरीकांना भेटत नाही. राजकीय नेते जमीन अधिग्रहण होणार नसल्याचे सांगतात.मात्र, काही दिवसांपूर्वीच सैन्य दलाने २३ गावांतील मालमत्तेची मुल्यांकन घेतले. त्यानंतर संबंधित क्षेत्रामध्ये असलेले उच्च प्रतिच्या मालमत्तेचा तपशील महसूल विभागाकडून घेतला असल्याचे समजते. या नंतर सैन्य दलाचे वाहने संबंधित गावामध्ये पाहणी करीत आहेत.

एक इंचही जागा जाऊ देणार नाही ः लंके 

याबाबत पक्षाध्यक्ष शरद पवार यांची भेट घेऊन जमीन अधिग्रहण न करणेबाबत या गावांच्या ग्रामसभेचे ठराव
या अगोदरच दिले आहेत. कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर पुढील केंद्रीय पातळीवरील भेटी होऊ शकल्या नाहीत. लवकरच पवार यांची भेट घेऊन याबाबत निश्चित मार्ग काढणार आहोत.

संपादन - अशोक निंबाळकर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'पवित्र ग्रंथ गुरु साहिब'ची पानं गुरुद्वारात घुसून फाडली! जमावाच्या बेदम मारहाणीत तरुणाचा मृत्यू

Nick Jonas: देसी गर्ल प्रियांका चोप्राचा पती निक जोनासची तब्येत बिघडली; व्हिडीओ शेअर करत म्हणाला...

Job Discrimination : मुंबईत नोकरी, पण मराठी माणसालाच नो एन्ट्री? लिंक्डइनवरील पोस्ट होतेय व्हायरल

Samruddhi Accident: समृद्धी महामार्गावरील अपघात कधी थांबणार? कारला मागून धडक दिल्याने तिघांचा मृत्यू

Bhavesh Gupta:'पेटीएम'च्या अध्यक्षांचा कंपनीला रामराम, तडकाफडकी घेतला करिअर ब्रेकचा निर्णय

SCROLL FOR NEXT