Minister Mushrif says about the bitterness of Parner's corporators 
अहिल्यानगर

पारनेरच्या नगरसेवकांच्या तिढ्याबाबत पालकमंत्री मुश्रीफ म्हणतात.. 

आनंद गायकवाड

संगमनेर : नगर जिल्ह्यात संगमनेरमध्ये कोरोना रुग्णांचा मृत्यूदर सर्वाधिक 9 टक्के असल्याबद्दल चिंता व्यक्त करताना, कोरोनाचा प्रभाव रोखण्यासाठी, तसेच तातडीने निदान व उपचारासाठी सर्वेक्षण व चाचण्या वाढविण्याचे निर्देश पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी आज दिले. 

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासकीय अधिकाऱ्यांसह मंत्री मुश्रीफ यांनी आज आढावा बैठक घेतली. त्यात ते बोलत होते. जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, पोलिस अधीक्षक अखिलेशकुमार सिंह, आमदार डॉ. सुधीर तांबे, नगराध्यक्ष दुर्गा तांबे, प्रांताधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे, तहसीलदार अमोल निकम, मुख्याधिकारी डॉ. सचिन बांगर आदी उपस्थित होते. 

नोव्हेंबरपर्यंत जग कोरोनामुक्त 

मंत्री मुश्रीफ म्हणाले, ""मुंबई, पुण्याहून आलेल्या लोकांमुळे नगर जिल्ह्यात कोरोनाचा प्रादूर्भाव वाढला. कोरोनासदृश लक्षणे आढळल्यास कोविड हेल्थ केअर सेंटरला जाऊन तपासणी करा. जिल्ह्यात संगमनेर तालुक्‍यात कोरोना रुग्णांचा मृत्यूदर सर्वाधिक 9 टक्के आहे. सप्टेंबरपर्यंत कोरोना रुग्णांची संख्या कमी होईल व नोंव्हेबरपर्यंत जग कोरोनामुक्त होईल.'' 

भाजपला रोखण्यासाठीच.. 

पारनेरमधील शिवसेनेच्या नगरसेवकांमुळे निर्माण झालेल्या राजकीय तिढ्याबद्दल भाष्य करताना ते म्हणाले, ""राज्यात तीन पक्षांचे आघाडी सरकार व तीन पक्षांची समन्वय समिती स्थापन केली आहे. मात्र, या तीन पक्षांतील लोक आपआपल्यातच पक्षांतर करीत असतील, तर काय करावे याचा विचार अद्याप झाला नव्हता. भाजपला रोखण्यासाठी त्यावर मार्ग काढावा लागेल.'' 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India Selection : रिषभ पंतला वन डे संघात स्थान नाही, पण मिळाले कर्णधारपद; Asian Games साठीच्या संघातही दोन बदल, भन्नाट टीम्स

MPSC Paper Leak : एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी; अभिजीत दिपकेंचं उमेदवारांना आंदोलनाचं आवाहन

Umarga News : उमरगा सामाजिक वनीकरण विभागात भ्रष्टाचाराचा आरोप; कारवाईत दिरंगाईमुळे युवासेनेकडून वनरक्षकावर शाईफेक

India Squad for WI Series: हार्दिक पांड्या संघाबाहेरच, जसप्रीत बुमराहचेही नाव गायब; ऋतुराज गायकवाडची वापसी, तर एक सप्राईज पॅकेज, जाणून घ्या भन्नाट टीम इंडिया

Censor Board: केंद्राकडून सेन्सॉर बोर्डाची फेररचना! १८ सदस्यांची निवड; निशिगंधा वाड, वामन केंद्रे, मनोज जोशींचा समावेश

SCROLL FOR NEXT