rime News Sakal
अहिल्यानगर

अहमदनगर : 13 वर्षांच्या मुलावर अनैसर्गिक अत्याचार, गुन्हा दाखल

गोरक्षनाथ बांदल

अहमदनगर : शहरातील 13 वर्षांच्या मुलासोबत प्रौढ व्यक्तीने अनैसर्गिक कृत्य केल्याची घटनासमोर आली. आरोपीने लष्करी गणवेश परिधान केलेला होता. तोफखाना पोलिस ठाण्यात अनैसर्गिक अत्याचार आणि पोक्‍सो कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नगर शहराच्या सावेडी उपनगरातील आठरे पाटील पब्लिक स्कूल रस्त्यावर बुधवारी (ता.13) ही घटना घडली आहे. 13 वर्षांचा हा अल्पवयीन पीडित मुलगा सायकलीवरून घराकडे चालला होता. त्यावेळी लष्करी गणवेश परिधान केलेल्या आणि रस्त्याने चाललेल्या या अनोळखी व्यक्तीने त्याला थांबविले. " मै आर्मीवाला हू,' असेही त्या व्यक्तीने सांगितले. येथील गॅरेजवर वाहन दुरुस्तीचे काम चालू असल्याचीही बतावणी केली. येथे लघुशंका करू शकतो का,' अशी विचारणा केल्यावर मुलाने "हो' म्हणून सांगितले. त्यावर लष्करी गणवेश परिधान केलेल्या त्या प्रौढ व्यक्तीने मुलाच्या हातातील सायकल हिसकावून घेत ती खाली पाडली आणि मुलाला रस्त्याकडेला असलेल्या काटवनात घेऊन गेला. तिथे त्या व्यक्तीने मुलाबरोबर अनैसर्गिक कृत्य केले. या प्रकाराची कोठे वाच्यता केल्यास मुलाला जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर शंभर रुपये देत तेथून ही व्यक्ती पसार झाली, असे मुलाने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. तोफखाना पोलिसांनी याप्रकरणी भा. दं. वि. कलम 377, अनैसर्गिक अत्याचार प्रतिबंधक तसेच लैंगिक गुन्हापासून बालकांच्या संरक्षण (पॉक्‍सो) कायद्यानुसार गुन्ह्याची नोंद केली आहे. अतिरिक्त पोलिस अधीक्षक सौरभ अग्रवाल, प्रभारी शहर पोलिस उपअधीक्षक अजित पाटील, पोलिस निरीक्षक ज्योती गडकरी यांनी घटनास्थळी पाहणी केली. आरोपीच्या शोधासाठी पथक रवाना केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sanjay Raut : संजय राऊत यांनी CJI सूर्यकांत यांची बिनशर्त मागितली माफी; म्हणाले- कोर्टाचा अपमान करण्याचा उद्देश नव्हता

Mehmaan Mode: आता 'मेहमान मोड' ऑन करा आणि पाहुण्यांसोबत बिनधास्त जेवण ऑर्डर करा! काय आहे झोमॅटोचे नवे फिचर?

दुष्काळात जगायचं कसं? कर्जासाठी शेतकऱ्याचं घरच केलं सील, कुटुंब उघड्यावर! सीलला हात लावला तर कारवाईचा इशारा... सरकारचे आदेश कागदावरच?

Latest Marathi News Update : गोकुळ दूध संघ अध्यक्ष निवडीच्या बैठकीला सुरुवात

Koyna Dam Water Release : सांगलीसाठी कोयनेचे दरवाजे उघडले! 2100 क्युसेकने विसर्ग सुरू; शेतीसाठी पाण्याचा उपसा केल्यास थेट 1 वर्षासाठी परवाना रद्द

SCROLL FOR NEXT