अॉक्सीजन Esakal
अहिल्यानगर

तिसरी लाट रोखण्यासाठी मिशन अॉक्सीजन स्वावलंबन

अशोक निंबाळकर

नगर ः कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या सामन्यासाठी जिल्हा प्रशासनामार्फत आरोग्य सुविधांचे बळकटीकरण केले जात आहे. त्या पार्श्‍वभूमीवर जिल्ह्यात ‘मिशन ऑक्‍सिजन स्वावलंबन’ अवलंबिले जाणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी दिली.

तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने आज राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी सर्व जिल्हाधिकारी आणि महानगरपालिका आयुक्त यांच्याशी दूरदृश्‍यप्रणालीद्वारे संवाद साधला. त्यानंतर जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी जिल्हास्तरावरील सर्व यंत्रणांची आढावा बैठक घेतली. याप्रसंगी जिल्हाधिकाऱ्यांनी मिशन ऑक्‍सिजनची माहिती दिली.

जिल्हाधिकारी म्हणाले, ‘‘सध्या कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटमुळे संपूर्ण राज्यात नवे निर्बंध लागू झाले आहेत. आपल्या जिल्ह्यातही स्तर-तीनचे निर्बंध लागू झाले आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्व उपाययोजना करण्यात येत आहेत. तिसऱ्या लाटेत किमान २३० टन ऑक्‍सिजनची गरज लागेल, असा अंदाज आहे. ऑक्‍सिजन व्यवस्थापन आराखडा तयार करण्याच्या सूचना राज्य सरकारने दिल्या आहेत. तो आपण लवकरच सरकारला सादर करणार आहोत.’’

‘‘जिल्ह्यासाठीची संभाव्य गरज २३० मेट्रिक टन आहे. त्यापैकी ७० टक्के लिक्विड मेडिकल ऑक्‍सिजन, २० टक्के सिलिंडरद्वारे, तर ऑक्‍सिजननिर्मिती प्रकल्पातून १० टक्के ऑक्‍सिजन मिळेल, असे नियोजन आहे. सध्या जिल्ह्यात १४ ग्रामीण रुग्णालयांसह १७ ऑक्‍सिजननिर्मिती प्रकल्प कार्यान्वित होत आहेत. सहा ठिकाणी त्यासाठीची मशिनरी प्राप्त झाली आहे. उर्वरित ठिकाणीही ती लवकरच येईल. महानगरपालिकेकडे स्वतःचे रुग्णालय नाही. त्यामुळे महापालिकेने २० टन साठवण क्षमतेची टाकी बनवावी. जी मोठी रुग्णालये आहेत, त्यांनी ड्युरा सिलिंडर उपलब्ध करून घ्यावीत. याशिवाय, किमान सहा टन साठवण क्षमता निर्माण करावी. किमान तीन दिवस पुरेल एवढा साठा शिल्लक राहील, याप्रमाणेच नियोजन करावे, अशा सूचना प्रत्येक रुग्णालयाला देण्यात आल्या आहेत,’’ असे त्यांनी सांगितले.

ऑक्‍सिजनवर राहणार नियंत्रण

ऑक्‍सिजन साठा आणि वापर, वाहतूक, यावर नियंत्रणासाठी जिल्हास्तरीय पथक कार्यान्वित करण्यात येणार असून, त्यात पोलिस, आरटीओ, अभियांत्रिकी प्राध्यापक आदी असतील, अशी माहिती त्यांनी दिली. राखीव साठ्यापैकी निम्मा साठा हा जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी, तर उर्वरित पन्नास टक्के साठा हा तालुकापातळीवर केला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPO Alert: ₹15 हजारांचे होऊ शकतात ₹20 हजार! 33% GMP सह 631 कोटींचा IPO आजपासून खुला; जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स

Mumbai Electricity: मुंबईत वारंवार वीजपुरवठा खंडित, मंत्री मंगलप्रभात लोढा यांचा प्रशासनावर संताप; आंदोलनाचा इशारा

Delhi Restaurant Fire : दिल्लीत रेस्टॉरंटमध्ये भीषण आग, २१ जणांचा होरपळून मृत्यू; आपचे माजी आमदार घटनास्थळी दाखल

फक्त एका ट्रिकने Instagram हॅक! Meta AI मधील त्रुटीचा गैरवापर; लाखो अकाउंट्सवर हॅकर्सचा हल्ला, सुरक्षेसाठी लगेच करा 'हे' काम

सचिन पिळगावकरांवर जीवापाड प्रेम करायची ही अभिनेत्री; पण 'या' व्यक्तीमुळे नाही होऊ शकलं लग्न, अखेर...

SCROLL FOR NEXT