MLA Lanka told police not to harass the poor 
अहिल्यानगर

Video : आमदार लंके पोलिसांना का म्हणाले, गाठ माझ्याशी आहे

सनी सोनावळे

टाकळी ढोकेश्वर ः तुम्ही-आम्ही सर्व शेतक-याचे पोर आहोत. आमच्या आई वडिलांनीदेखील भाजीपाला विकला आहे. त्यांच्या व्यथा आम्हाला माहिती आहेत. त्यांना धमकावणे, मारहाण करणे हे योग्य नाही. अन्यथा गाठ माझ्याशी आहे, असा सज्जड इशारा आमदार नीलेश लंके यांनी पोलिसांना दिला आहे.

टाकळी ढोकेश्वर (ता.पारनेर) येथे भाजीपाला विक्रीसाठी अनेक शेतकरी येतात. कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर लाॅकडाऊनमुळे ठराविक वेळ ही त्यांना भाजीपाला विक्रीसाठी दिली आहे. मात्र, थोडा उशीरा झाल्याने त्यांना तेथील पोलिसांनी धमकावून मारहाण केली. त्यांचे वजन-काटे जप्त केले. गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली.

ही माहिती शेतक-यांनी आमदार लंके यांना दिल्यानंतर लंके यांनी तात्काळ तिथे जात पोलिसांना चांगलेच धारेवर धरले. या बाबत जाब विचारला. त्यावेळी मात्र, पोलिसांची चांगलीच तांरबळ उडाली. या घटनेचा व्हिडिओच सोशल मीडियावर चांगलाचा व्हायरल झाला आहे.

आमदार लंके त्या व्हिडिओमध्ये म्हणताना दिसतात, मोठ्यांची पोरं कोणी पोलीस होत नाही. तुम्हीही शेतक-याचे पोर आहात. तुम्ही आणि मी शेतकरी कुटुंबातुनच पुढे आलो आहोत. त्यामुळे गरिबांना त्रास देणे बंद करा. बाजारपेठेतील दुकाने अर्धे दरवाजे उघडे ठेवुन सुरू असतात. तिथे आपण जात नाहीत. मात्र, गरिबांना धमकवाता, मारहाण करता हे बरोबर नाही. हे बंद करा नाहीतर मला तुमचे दुसरे उद्योग बाहेर काढावा लागतील. हे लक्षात ठेवा असा इशारा लंके यांनी दिला.

टाकळी ढोकेश्वर पोलिस चौकीचे शुध्दीकरण होणे गरजेचे आहे. आपल्याबद्दल अनेक तक्रारी आल्या आहेत 
याबद्दल जाहीर नाराजी व्यक्त केली. या बाबत संबंधित खजिल झाल्याचे दिसले.

संपादन - अशोक निंबाळकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कॅब लवकर हवी? आता आधीच टिप देण्याचा खेळ संपला! सरकारचा Uber-Ola ला मोठा आदेश

Gelatin Blast: पुण्यातल्या कामगाराचं भयंकर कृत्य! कमरेला स्फोटकं बांधून सासरवाडीत पोहोचला, एक बटण दाबलं अन् सगळं संपलं

Onion Rate : मंचर बाजार समितीत कांद्याला दहा किलोस मिळाला ४११ रुपये उच्चांकी बाजार भाव

Sangli Accident: रेणावी घाटात काळाचा घाला! दोन एसटी बस समोरासमोर धडकल्या, तीन जणांचा मृत्यू, काही जखमी

Pune News : प्रशासनातील वाद चव्हाट्यावर! वरिष्ठ अधिकारी दुजाभाव करतात; महापालिका आयुक्तांकडे तक्रार

SCROLL FOR NEXT