MLA Monica Rajale  Esakal
अहिल्यानगर

'विरोधकांच्या टीकेची पर्वा करत नाही' - आमदार मोनिका राजळे

सकाळ डिजिटल टीम

पाथर्डी (जि. अहमदनगर) : प्रामाणिकपणे जनतेची कामे करत राहिलो, तर जनता तुमच्या पाठीशी उभी राहते, हे आपण दोन विधानसभा निवडणुकांत अनुभवले आहे. त्यामुळे आपण विरोधकांच्या टीकेची पर्वा करत नसून, जनतेची कामे करत राहू, असा टोला आमदार मोनिका राजळे यांनी राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस ॲड. प्रताप ढाकणे यांचा नामोल्लेख टाळून लगावला.

पंचायत समिती सदस्या मनीषा वायकर यांच्या निधीतून माळीबाभूळगाव येथे विविध विकासकामांचा प्रारंभ करण्यात आला. त्यावेळी त्या बोलत होत्या. भाजपचे तालुकाध्यक्ष माणिक खेडकर, सोमनाथ खेडकर, जिल्हा परिषद सदस्या संध्या आठरे, राहुल राजळे, पंचायत समिती सभापती सुनीता दौंड, एकनाथ आटकर, नामदेव लबडे, रवींद्र वायकर, मढी देवस्थानचे अध्यक्ष संजय मरकड उपस्थित होते.

राजळे म्हणाल्या, अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्यांना भरपाई मिळावी म्हणून आम्ही अहमदनगर येथे उपोषण केले, तर काहींनी आमच्यावर टीका केली. ही टीका आमच्यावर नसून नुकसानग्रस्तांचा अपमान आहे. राजकारण कोठे करावे, याचे भान काहींना राहिले नाही. तालुका विकासाच्या प्रवाहात आहे. नुकत्याच जाहीर झालेल्या केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत तालुक्यातील तीन विद्यार्थ्यांनी यश संपादन केले असल्याचे त्या शेवटी म्हणाल्या. प्रास्ताविक आर. बी. शेख सूत्रसंचालन राजू सुरवसे, तर आभार रशीद शेख यांनी मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 world Cup Final नंतर आता राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेचे यजमानपद अहमदाबादला! आज झाला मोठा निर्णय

India's Test Downfall: तुला हवं ते सर्व दिलं अन् तू टीम इंडियाचं वाटोळं केलंस! गौतम गंभीरच्या हट्टापाई कसोटीत आपली पिछेहाट...

SMAT 2025: ऋतुराज गायकवाडने मोडले विराट-गिलचे विक्रम, पण महाराष्ट्राचा पहिल्याच सामन्यात पराभव; पृथ्वी शॉही अपयशी

Barshi News : अखेर बार्शीच्या 'त्या' ग्रामपंचायत अधिकाऱ्याचा मृत्यू; नोकरीवरुन काढून टाकण्याची दिली होती धमकी

Latest Marathi News Live Update: हुपरी पालिका निवडणुकीत चिन्हावरून मोठा वाद

SCROLL FOR NEXT