अहमदनगर

फळपीक योजनेत सहभागी होण्याचा मार्ग मोकळा: आमदार विखे पाटील

सकाऴ वृत्तसेवा

आमदार राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, ‘‘राज्‍य सरकारने पुनर्रचित हवामान आधारित फळ‍पीक विमा योजना लागू केली होती.

शिर्डी (अहमदनगर) : ‘‘हवामानावर आधारित फळपीक विमा योजनेतील प्रमाणकांमध्‍ये (ट्रीगर) तातडीने बदल करावेत, या आपल्या मागणीची मुख्‍यमंत्र्यांनी दखल घेऊन, या योजनेतील जाचक अटी रद्द करण्‍याचा निर्णय घेतला. त्यामुळे फळपीक उत्‍पादकांना दिलासा मिळून, या योजनेत सहभाग घेण्‍याचा मार्ग मोकळा झाला आहे,’’ अशी माहिती आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली. (MLA radhakrishna vikhe patil says there should be immediate changes in the norms of weather based fruit crop insurance scheme)

विखे पाटील म्हणाले, ‘‘राज्‍य सरकारने पुनर्रचित हवामान आधारित फळ‍पीक विमा योजना लागू केली होती. मात्र, योजनेतील निकष हे शेतकऱ्यांचे नव्‍हे, तर कंपन्‍यांचे हित जोपासणारे होते, ही गंभीर बाब नऊ मार्च २०२० रोजी मुख्‍यमंत्र्यांच्‍या निदर्शनास आणून दिली होती. मागील अर्थसंकल्‍पीय अधिवेशनातही या प्रश्‍नावर आवाज उठवून नफेखोरी केलेल्‍या कंपन्‍यांवर टीकेची झोड उठविली होती. याबाबत राज्‍य सरकारने मागणीची दखल घेऊन फळपीक विमा योजनेच्‍या निकषात बदल करीत, फळबाग उत्‍पादकांना दिलासा देण्‍याचा प्रयत्‍न केला आहे.’’

‘‘कोरोना महामारीच्‍या पार्श्‍वभूमीवर शेतकरी मोठ्या प्रमाणात अडचणीत आहेत. कोरोनाचे महासंकट अद्यापही दूर झालेले नाही. निसर्गाच्‍या लहरीपणामुळे फळपिकांची जोखीमही वाढली आहे. अशा सर्व बाबींचा विचार करता, पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजनेमध्‍ये निश्चित केलेल्‍या प्रमाणकांचा फेरविचार करून सुधारित निकष पुन्‍हा जाहीर करावेत, अशी मागणी आपण राज्‍य सरकारकडे केली होती. फळपीक नुकसान संरक्षण कालावधीत भरपाई प्राप्‍त होण्‍यासाठी निश्चित केलेली प्रमाणके (ट्रीगर) हे वास्‍तव हवामान परिस्थितीच्‍या विपरीत होते, ही बाब सरकारच्‍या निदर्शनास आणून दिली होती.

पूर्वी या योजनेसाठी पावसाचा निकष दोन दिवसांसाठी होता, शिवाय पावसाचा खंड हे प्रमाणक होते. शासनाने नव्‍याने लागू केलेल्‍या निकषांमध्‍ये जास्‍त पावसाचे निश्चित केलेले प्रमाणकच योजनेच्‍या लाभासाठी फळबाग उत्‍पादकांना अडचणीचे ठरणार होते. शेतकऱ्यांना दिलासा मिळावा म्‍हणून या फळपीक योजनेच्‍या संदर्भात केलेल्‍या पाठपुराव्‍याला अखेर यश आले असून, योजनेचे निकष बदलण्‍याचा निर्णय सरकारने घेतल्‍याने शेतकऱ्यांना दिलासा मिळण्‍याचा, तसेच नव्‍या निकषांप्रमाणे लाभ घेण्‍याचा मार्ग मोकळा झाला आहे,’’ असे ते म्हणाले. (MLA radhakrishna vikhe patil says there should be immediate changes in the norms of weather based fruit crop insurance scheme)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : योगी आदित्यनाथ यांची काँग्रेसवर टीका; म्हणाले, काँग्रेसची जिझिया कर लावण्याची इच्छा

Virat Kohli : 'खूप फसवणूक झाली मात्र आता...' विराट कसा झाला 634 कोटी रूपयाचा मालक?

Car Maintenance Tips: कारची 'अशी' घ्या काळजी, अन्यथा लागेल गंज

Juice For Diabetes : मधुमेहाच्या रुग्णांनी प्यायलाच हवेत 'हे ज्यूस, रक्तातील साखरेची पातळी राहील नियंत्रणात

Karan Bhushan Singh: ब्रिजभूषण सिंहच्या मुलाच्या प्रचार रॅलीत फायरिंग? चौकशीतून काय समोर आलं?

SCROLL FOR NEXT