MLA Rohit Pawar came to power in the village of BJP minister Ram Shinde.jpg
MLA Rohit Pawar came to power in the village of BJP minister Ram Shinde.jpg 
अहमदनगर

भाजपचे मंत्री राम शिंदेंच्या गावातही रोहित पवारांची सत्ता

वसंत सानप

जामखेड (अहमदनगर) : माजीमंत्री राम शिंदे यांच्या चौंडी ग्रामपंचायतीवर आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वाखालील पँनलच्या आशाताई सुनील उबाळे यांची सरपंचपदी तर कल्याण रामभाऊ शिंदे यांची उपसरपंचपदी बिनविरोध निवड झाली.

ग्रामपंचायत निवडणुकीत माजी मंत्री राम शिंदें यांच्या पँनलचा पराभव झाला होता. त्यांच्या पँनलला नऊ पैकी केवळ दोन जागा मिळाल्या होत्या तर आमदार रोहित पवारांच्या नेतृत्वाखालील पँनलला सात जागासह निर्विवाद सत्ता मिळाली होती.

दरम्यान मंगळवार (ता.०९) रोजी होणाऱ्या सरपंच-उपसरपंच निवडीत माजी मंत्री शिंदेंकडून काही तरी चमत्कार होईल आणि सरपंच उपसरपंच निवडीत बदल दिसेल, अशी राजकीय चर्चा होती. मात्र, पवारांच्या दुरद्रष्टीमुळे निवडून आलेले सात सदस्य एकसंध राहिले आणि माजी मंत्री शिंदेंचा 'करिष्मा' चालला नाही आणि आमदार पवारांनी येथेही आपले 'वर्चस्व' कायम ठेवले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 
 
सरपंचपदासाठी आशा उबाळे यांचा तर उपसरपंच पदासाठी कल्याण शिंदे या दोघांचा प्रत्येकी एकच अर्ज आल्याने दोन्ही निवडी बिनविरोध झाल्या. सरपंच आशा उबाळे यांचे पती सुनील उबाळे हे आमदार रोहित पवारांचे 'कट्टर ' समर्थक म्हणून ओळखले जातात. विधानसभा निवडणुकीत उबाळे यांनी आमदार पवारांसाठी मोठे परिश्रम घेतले होते. ग्रामपंचायतीच्या निमित्ताने उबाळे व त्यांच्या सहकार्यांच्या माध्यमातून आमदार पवार यांनी चौंडीची सत्ता आपल्या हाती घेऊन माजी मंत्री राम शिंदे यांना येथेही धोबीपछाड दिली आहे. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Devendra Fadnavis : तिथं जा नाश्ता वगैरे करा अन्... उद्धव ठाकरेंच्या भेटीपूर्वी अमित शाहांना फडणवीस काय म्हणाले होते?

Indian Economy: भारताच्या अर्थव्यवस्थेसाठी आनंदाची बातमी! UNने 2024 साठी जीडीपी वाढीचा अंदाज वाढवला

Jalgaon News : दूषित पाण्याच्या नमुन्यांमध्ये लक्षणीय घट; डेंग्यूबाबत आरोग्य यंत्रणेच्या उपाययोजनांना यश

Latest Marathi News Live Update : धक्कादायक! पुण्यात कोयत्याने सपासप करुन तरुणाचा टोळक्याकडून खून

परदेशात पळून गेलेला खासदार भारतात आलाच नाही; आता 'रेड कॉर्नर नोटीस' बजावणे हाच एकमेव मार्ग शिल्लक!

SCROLL FOR NEXT