MLA Rohit Pawar criticizes BJP after the results of the Legislative Council 
अहिल्यानगर

भाजपसाठी प्रतिष्ठेची पण महाविकास आघाडीसाठी ही निवडणूक निष्ठेची होती

अशोक मुरुमकर

अहमदनगर : विधान परिषदेच्या पाच जागांसाठी झालेल्या निवडणुकीत महाविकास आघाडीने भाजप विरुद्ध एकत्रीत रिंगणात उतरत चार जागांवर विजय मिळाला आहे. यामुळे महाविकास आघाडीच्या कार्यक्रमर्त्यांमध्ये उत्साह वाढला आहे. यावर राष्ट्रवादीचे युवा आमदार रोहित पवार यांनी प्रतिक्रिया देताना म्हटलं आहे की, भाजपसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची असली तरी महाविकास आघाडीसाठी निष्ठेची होती.

विधान परिषदेच्या निवडणूकीत राष्ट्रवादी, काँग्रेस, शिवसेनेसह सहयोगी पक्ष एकत्र होते. कार्यकर्त्यांनी या माध्यमातून एकमेकांबद्दल निष्ठाच यानिमित्ताने दाखवली आहे. या निवडणुकीत जनतेने महाविकास आघाडीची मनातील जागा कायम ठेऊन भाजपला त्यांची 'जागा' दाखवून दिली, असा टोला देखील आमदार पवार यांनी भाजपला लगावला आहे. विधान परिषदेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीनं जोरदार मुसंडी मारली. त्यानंतर काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेनेच्या नेत्यांनी प्रतिक्रीया दिल्या आहेत. 

नागपूर पदवीधर निवडणुकीत भाजपला महाविकास आघाडीमुळे जबर धक्का बसला आहे. भाजपचे नेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बालेकिल्ल्यात महाविकास आघाडीचा झेंडा फडकला आहे. आमदार पवार यांनी ट्विट करुन प्रतिक्रीया दिली आहे. यामध्ये त्यांनी म्हटले की, भाजपसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची असली तरी महाविकास आघाडीसाठी निष्ठेची होती. राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस व शिवसेनेसह सहयोगी पक्षांच्या तळागाळातील कार्यकर्त्यांनी एकमेकांबद्दल दाखवलेली निष्ठाच आज कामी आली. या निवडणुकीत जनतेने मविआची मनातील जागा कायम ठेऊन भाजपला त्यांची 'जागा' दाखवून दिली. 

भाजपचे म्हणवल्या जाणाऱ्या नागपूर, पुण्यासारख्या बुरुजालाही सुरुंग लावत इथं महाविकासआघाडीने विजयाचा झेंडा रोवला. त्यामुळं आतातरी महाराष्ट्र भाजपने ने खऱ्या अर्थाने विरोधी पक्ष म्हणून प्रामाणिकपणे काम करण्यास सुरुवात करायला हरकत नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Suresh Kalmadi: सुरेश कलमाडींनी विमानातून बॉम्बहल्ला केला अन् मिझोराम भारतातील २३ राज्य बनले, काय आहे किस्सा?

Chandrabhaga River Pollution: कोट्यवधींचा खर्च पाण्यात! पवित्र चंद्रभागा नदीला प्रदूषणाचा विळखा; जलचर प्राणी,‌भाविकांचे आरोग्य धोक्यात..

Gold Silver Market Impact : सोन्या, चांदीचे दर आणखी वाढणार! अमेरिकेने केलेल्या कारनाम्याचा जागतिक बाजारावर परिणाम

Methanol Fuel : कार्बन डाय ऑक्साइडमधून मिळणार मिथेनॉल इंधन

MLA Raju Khare: एकनाथ शिंदे-अजित पवार एकत्र आले तर फडणवीसांचे सरकार पडेल; मोहोळचे आमदार राजू खरे, नेमकं काय म्हणाले?

SCROLL FOR NEXT