Mocca against eight people including Lawrence Swamy in a robbery case 
अहिल्यानगर

दरोड्याच्या गुन्ह्यातील लॉरेन्स स्वामीसह आठ जणांविरुद्ध मोक्का

सकाळ वृत्तसेवा

अहमदनगर : दरोड्याच्या गुन्ह्यातील आरोपी लॉरेन्स स्वामी याच्यासह आठ जणांविरुद्ध पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी "मोक्का' च्या प्रस्ताव विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. प्रताप दिघावकर यांच्याकडे पाठविला होता. त्याला डॉ. दिघावकर यांनी मंजुरी दिल्याची माहिती पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी दिली. 

प्रकाश भिंगारदिवे (रा. निंबोडी), संदीप शिंदे (रा. बुरूडगाव रस्ता), विक्रम गायकवाड(रा. वाळूंज, ता. नगर), बाबा उर्फ भाऊसाहेब आढाव, संदीप भिंगारदिवे, बाळासाहेब भिंगारदिवे, लॉरेन्स दोराई स्वामी(रा. भिंगार) अशी त्यांची नावे आहेत. 

नगर जिल्ह्यातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
नगर-सोलापूर रस्त्यावरील भिंगार छावणी परिषदेच्या जकात नाक्‍यावर काही तरुणांनी धुडगूस घालून कर्मचाऱ्यांना मारहाण करीत दरोडा घातला होता. त्यात लॉरेन्स स्वामीसह वरील आरोपींची नावे निष्पन्न झाली होती. भिंगार पोलिसांनी सिनेस्टाईल लॉरेन्स स्वामी याला त्याच्या राहत्या घरातून अटक केली होती.

लॉरेन्स स्वामीसह अन्य आरोपींविरुद्ध भिंगार कॅम्प पोलिसांनी मोक्का (महाराष्ट्र राज्य संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक कायदा) कारवाईचा प्रस्ताव पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांच्याकडे पाठविला होता. त्यांनी तो प्रस्ताव विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. प्रताप दिघावकर यांच्याकडे पाठविला. डॉ. दिघावकर यांनी प्रस्तावाला मंजुरी दिली. 

संपादन : अशोक मुरुमकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'Gautam Gambhir मला देशद्रोही म्हटलं अन् अपशब्दही वापरले... ', विश्वविजेत्या भारतीय खेळाडूचा खळबजनक आरोप

Pune Water Issue : पुणे महापालिकेचे कडक पाऊल! व्यावसायिक कारणासाठी पिण्याचे पाणी वापरल्यास कारवाई

Pune Crime : भोंदूबाबा मिश्रासह महिला आरोपींचा असहकार; तपास अधिकाऱ्याची न्यायालयात माहिती

Indigenously Built Warship : भारतीय नौदलाच्या ताफ्यात तीन स्वदेशी युद्धनौकांची भर; उद्या कोलकात्यात समारंभ

Mumbai News : देशातील पहिल्या पर्यटन पाणबुडीच्या बांधणीला सुरुवात; २०२७ मध्ये प्रकल्प पूर्ण होणार

SCROLL FOR NEXT