In more than four lakh tonnes of onions 
अहिल्यानगर

कांदा पडून... शेतकऱ्यांचा डोक्‍याला हात... 

मार्तंड बुचुडे

पारनेर ः कांद्याला गेल्या वर्षी मिळालेल्या वारेमाप बाजारभावामुळे, या वर्षी तालुक्‍यातील 22 हजार 235 हेक्‍टरवर कांदालागवड झाली होती. किमान साडेपाच लाख टनांपेक्षा अधिक उत्पादन झाले. मात्र, लॉकडाउन आणि बाजारभावाअभावी बहुतेक शेतकऱ्यांनी किमान चार लाख टनांहून अधिक कांदा साठविला आहे. या शेतकऱ्यांना वाचविण्यासाठी सरकारने "नाफेड'मार्फत किमान 20 रुपये दराने कांदा खरेदी करावा, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे. 

पारनेर बाजार समितीत गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये कांद्याला 15 हजार रुपये क्विंटल असा उच्चांकी भाव मिळाला. परिणामी, यंदा सुमारे 22 हजार 235 हेक्‍टरवर कांदालागवड झाली. सुमारे साडेपाच लाख टन उत्पादन झाले. उत्पादन वाढल्याने, तसेच देशात व राज्यातही लॉकडाउनमुळे कांद्याची मागणी मोठ्या प्रमाणात घटल्याने, अवघा पाच ते सहा रुपये किलो, म्हणजे पाचशे ते सहाशे रुपये क्विंटल दर मिळत असल्याने शेतकऱ्यांनी कांदा चाळींमध्ये साठविला. भविष्यात चांगला भाव मिळाला नाही तर मात्र शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान होणार आहे. कांदालागवडीचा खर्च हेक्‍टरी सुमारे 70 हजार रुपयांच्या आसपास येतो. त्यामुळे किमान 20 रुपये किलो दराने सरकारने "नाफेड'मार्फत कांदा खरेदी करावा, अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे. 

किलोमागे पाच रुपये अनुदान द्यावे ः गायकवाड 
पारनेर बाजार समितीचे सभापती प्रशांत गायकवाड म्हणाले, की सरकारने शेतकरी कृषी उत्पादक कंपन्यांना नऊ रुपये किलो दराने कांदाखरेदीची परवानगी दिली आहे. शेतकऱ्यांनी तो तेथे स्वतः ग्रेडिंग करून पाठवायचा आहे. मात्र, बाजार समित्यांना परवानगी दिली नाही. त्यामुळे शेतकरी नाराज आहेत. अडीच महिने बाजार समितीमधील कांदाखरेदी बंद आहे. कांद्यासाठी प्रामुख्याने दक्षिण भारत व हॉटेल व्यावसायिकांची मोठी मागणी असते. ही मागणी सध्या नाहीच. निर्यातीलाही कोरोना संकटामुळे अडचणी आहेत. त्यामुळे भाव कमी झाले. त्यासाठी सरकारने शेतकऱ्यांना किलोमागे पाच रुपये अनुदान द्यावे किंवा 20 रुपये दराने "नाफेड'मार्फत कांदा खरेदी करावा. 


सध्या कांद्याला बाजारभाव कमी आहे. शेतकऱ्यांनी दर्जेदार कांदा चांगल्या पद्धतीने साठवून ठेवावा. भविष्यात नोव्हेंबर- डिसेंबरमध्ये चांगला बाजारभाव मिळण्याची शक्‍यता आहे. कांदाविक्रीची घाई करू नये, कारण साठविलेला अनेकांचा कांदाही पावसाने भिजल्याने फार दिवस टिकणार नाही. 
- रामदास दरेकर, तालुका कृषी अधिकारी  

 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashok Kharat Case : कालाय तस्मै नम:! चाकणकरांनी पीडितांना न्याय न दिल्यानं परतफेडीची वेळ, खरातला राजकीय पाठबळ; रोहिणी खडसेंचा घणाघात

बॅट दे रे...! T20 World Cup मध्ये तीन भोपळ्यांनंतर अभिषेक शर्माचा मेसेज येताच काय दिलं शुभमन गिलने उत्तर; पाहा Video

April Travel Destination: एप्रिलमध्ये ट्रिप प्लॅन करताय? या’ 5 ठिकाणांना भेट देणं ठरेल बेस्ट

मला अटक केली तर तुमच्यावर कोप होईल; अटकेआधी अशोक खरातची पोलिसांना धमकी; नेमकं काय म्हणाला?

पहिल्यांदाच सासू आणि नणंदेसोबत दिसली दीपिका पादुकोण; सासरच्यांसोबतचं वागणं पाहून नेटकरी चकीत

SCROLL FOR NEXT