The mother last saw the child on her mobile 
अहिल्यानगर

कोरोनाने केली ताटातूट... आईने मोबाईलवरच घेतलं मुलाचं अंत्यदर्शन

सकाळ वृत्तसेवा

श्रीरामपूर ः कोरोनामुळे देशात दोन महिन्यांपासून लॉकडाउन सुरू आहे. तालुक्‍यातील दत्तनगर येथील शेतकरी संजय ऊर्फ काकासाहेब रामभाऊ शिंदे (वय 43) यांचे चेन्नई येथे निधन झाले. मात्र, त्यांचे पार्थिव इकडे आणणे किंवा नातेवाईकांना येथून तिकडे जाणे अशक्‍य होते. आई तर मुलाची आतुरतेने वाट पाहत होती.

दत्तनगर येथील संजय शिंदे यांचे काल (ता. 10) चेन्नई येथील एमजीएम रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले. शिंदे यांच्यावर स्थानिक डॉक्‍टरांच्या सल्ल्यानुसार, तीन महिन्यांपासून पुण्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, औषधोपचारास प्रतिसाद देत नसल्याने त्यांना चेन्नई येथील रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, तेथेही प्रकृती बिघडल्याने शिंदे यांचे निधन झाले.

त्यांचे सर्व नातेवाईक दत्तनगर येथे असून, लॉकडाउनमुळे मृतदेह इकडे आणणे शक्‍य नव्हते. त्यांच्या पत्नी, बंधू उद्योजक नंदू शिंदे व बापू शिंदे यांनी चेन्नई येथेच त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले. संजय यांच्या आई, बंधू, दत्तनगरचे माजी उपसरपंच नानासाहेब शिंदे व पंचायत समितीच्या सभापती संगीता शिंदे यांच्यासह अनेकांनी व्हिडिओ कॉलवरच त्यांना अखेरचा निरोप दिला. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs AFG: १५ वर्षांच्या वैभव सूर्यंवशीसमोर बुमराहचा यॉर्कर अन् बाऊन्सरचा मारा! सरावावेळी नेमकं काय घडलं?

Civic Body Clash: स्वच्छता साहित्य डीबीटीने देणे अशक्य; महापालिका प्रशासनाचा फेरप्रस्ताव, स्थायी समितीशी संघर्षाची शक्यता

नितीन गडकरींना मुंबईतील वाहतूक कोंडीचा फटका; नियोजित कार्यक्रमात पोहोचण्यास तासभर उशीर; म्हणाले, जुन्या उड्डाणपुलांऐवजी...

ENG vs PAK, Test: इंग्लंडचा पाकिस्तानला व्हाईटवॉश! बर्मिंगहॅम कसोटीतील विजयानंतर WTC Points Table मध्येही मोठे बदल

Youth Sena Leader Car Crash: युवासेना पदाधिकाऱ्याच्या थारची दुचाकीला धडक; कामगार गंभीर जखमी, खर्च न दिल्याचा आरोप करत गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT